Tokyo Olympics: ऑलिम्पिक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक (Men’s Javelin Throw) प्रकारात भारताचा नीरज चोप्रा याने इतिहास रचला. पात्रता फेरीत त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाला फेकताना नीरजने सर्वात लांब अंतर गाठण्याची किमया साधली. यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे पहिले सुवर्ण ठरले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला वैयक्तिक स्तरावर ही दुसरे सुवर्णपदक मिळाले. नीरजच्या विजयावर साऱ्यांनीच शुभेच्छा दिल्या आणि त्याचे अभिनंदन केले. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने नीरजच्या विजयाबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केले.

Also Read: Olympics: ‘गोल्डन’ मॅन नीरजला पंतप्रधान मोदींचा फोन

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणं हे १९८३, २००७ आणि २०११च्या ऑलिम्पिक विजयांपेक्षाही मोठं आहे, अशी भावना गंभीरने व्यक्त केली होती. त्याचसारखी भावना हरभजनने नीरजच्या विजयावर व्यक्त केली. “नीरजने जिंकलेले ऑलिम्पिक गोल्ड मेडल म्हणजे २०११च्या विश्वचषक विजयापेक्षाही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने २०११चा विजय भारतभरात साजरा करण्यात आला होता, त्यापेक्षा नीरजच्या विजयाचं ५० पटीने मोठं सेलिब्रेशन व्हायला हवं”, अशा भावना हरभजनने एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या.

Golden-Man-Neeraj-Chopra

Also Read: Olympics: ‘गोल्डन’ मॅन नीरजवर बक्षीसांची बरसात; वाचा सविस्तर

भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राशी पंतप्रधान मोदी यांनी थेट फोनवरून संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. “नीरजशी नुकतंच माझं फोनवरून बोलणं झालं. मी त्याला सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्याचं अभिनंदन केलं. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान त्याने केलेल्या मेहनतीची आणि दृढतेची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याची प्रतिभा आणि खेळभावना वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून आणि संपूर्ण भारतीयांकडून शुभेच्छा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here