रत्नागिरी : ‘निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन आंदोलन, सणासुदीचे बंदोबस्त आदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड आता बंदोबस्तात दिसणार नाहीत. होमगार्डचे मानधन आणि भत्त्यावर होणारा खर्च कपात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत होमगार्ड बंदोबस्त बंद केला आहे. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाला तसे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४६० होमगार्ड बेरोजगार झाले असून पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे.

राज्यात सुमारे ५४ हजार होमगार्डची संख्या आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील होमगार्डची संख्या ४६० आहे. या होमगार्डचा बंदोबस्त लागतो तेव्हा त्यांना ५७० रुपये मानधन, तर १०० रुपये उपहार भत्ता मिळतो. वर्षातील सणासुदीचा दिवस असो किंवा मंत्र्यांचा दौरा, मेळावे, मोर्चे, आंदोलने आदीसाठी कायदा व सुव्यवस्थेचा विचार आला की, पोलिस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी दुसरी यंत्रणा म्हणजे होमगार्ड. मात्र, शासनाला आता ही यंत्रणा डोईजड झाल्याचे दिसते. गृहरक्षकांचे (होमगार्ड) मानधन आणि भत्ते यांवर होणारा खर्च सातत्याने वाढत आहे.

हेही वाचा- राणे बंधुना दिली या पदाची महत्वपूर्ण जबाबदारी…

पोलिसांचा ताण वाढणार

त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडत आहे. वित्त विभागाने हा खर्च कमी करण्यासाठी बंधने घातली आहेत. त्यासाठी होमगार्डचे कामाचे दिवस कमी करण्याच्या सूचना होत्या. मात्र आता बारावीच्या परीक्षेपासून बंदोबस्तच बंद करण्याचे आदेश आहेत. बारावीची परीक्षा, त्यानंतर येणारा कोकणातील सर्वांत मोठा शिमगोत्सव, दहावीची परीक्षा आदीसाठी पोलिसांबरोबर होमगार्ड बंदोबस्ताला असतात. त्यामुळे पोलिचांचा भार कमी होतो. मात्र आता नसल्यामुळे पोलिसांचा ताण आणि भार वाढणार आहे.

हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा…

शासनाने समादेशक पद केले  रद्द

जिल्हा समादेशक हे पद गेली काही वर्षे रिक्त आहे. त्याचा पदभार अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आहे. आता समादेशक हे पद शासनाने रद्द केल्याचे समजते. त्यामुळे यापुढे होमगार्डच्या समादेशकपदाचा भार पोलिस दलाकडेच राहणार आहे.

हेही वाचा- धक्कादायक : रत्नागिरीत सातशे रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या..

होमगार्ड बंदोबस्तच बंदचे आदेश

शासनाच्या तिजोरीवर पडणारा खर्च कमी करण्यासाठी होमगार्डचे कामाचे दिवस कमी करण्यात येणार होते. मात्र, बारावीच्या परीक्षेनंतर होमगार्ड बंदोबस्तच बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
श्री. साळुंखे, होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी

News Item ID:
599-news_story-1582608997
Mobile Device Headline:
रत्नागिरीतील ४६० होमगार्ड होणार बेरोजगार का ते वाचा…?
Appearance Status Tags:
homeguard out  in settlements kokanmarathi newshomeguard out  in settlements kokanmarathi news
Mobile Body:

रत्नागिरी : ‘निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन आंदोलन, सणासुदीचे बंदोबस्त आदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड आता बंदोबस्तात दिसणार नाहीत. होमगार्डचे मानधन आणि भत्त्यावर होणारा खर्च कपात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत होमगार्ड बंदोबस्त बंद केला आहे. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाला तसे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४६० होमगार्ड बेरोजगार झाले असून पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे.

राज्यात सुमारे ५४ हजार होमगार्डची संख्या आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील होमगार्डची संख्या ४६० आहे. या होमगार्डचा बंदोबस्त लागतो तेव्हा त्यांना ५७० रुपये मानधन, तर १०० रुपये उपहार भत्ता मिळतो. वर्षातील सणासुदीचा दिवस असो किंवा मंत्र्यांचा दौरा, मेळावे, मोर्चे, आंदोलने आदीसाठी कायदा व सुव्यवस्थेचा विचार आला की, पोलिस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी दुसरी यंत्रणा म्हणजे होमगार्ड. मात्र, शासनाला आता ही यंत्रणा डोईजड झाल्याचे दिसते. गृहरक्षकांचे (होमगार्ड) मानधन आणि भत्ते यांवर होणारा खर्च सातत्याने वाढत आहे.

हेही वाचा- राणे बंधुना दिली या पदाची महत्वपूर्ण जबाबदारी…

पोलिसांचा ताण वाढणार

त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडत आहे. वित्त विभागाने हा खर्च कमी करण्यासाठी बंधने घातली आहेत. त्यासाठी होमगार्डचे कामाचे दिवस कमी करण्याच्या सूचना होत्या. मात्र आता बारावीच्या परीक्षेपासून बंदोबस्तच बंद करण्याचे आदेश आहेत. बारावीची परीक्षा, त्यानंतर येणारा कोकणातील सर्वांत मोठा शिमगोत्सव, दहावीची परीक्षा आदीसाठी पोलिसांबरोबर होमगार्ड बंदोबस्ताला असतात. त्यामुळे पोलिचांचा भार कमी होतो. मात्र आता नसल्यामुळे पोलिसांचा ताण आणि भार वाढणार आहे.

हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा…

शासनाने समादेशक पद केले  रद्द

जिल्हा समादेशक हे पद गेली काही वर्षे रिक्त आहे. त्याचा पदभार अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आहे. आता समादेशक हे पद शासनाने रद्द केल्याचे समजते. त्यामुळे यापुढे होमगार्डच्या समादेशकपदाचा भार पोलिस दलाकडेच राहणार आहे.

हेही वाचा- धक्कादायक : रत्नागिरीत सातशे रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या..

होमगार्ड बंदोबस्तच बंदचे आदेश

शासनाच्या तिजोरीवर पडणारा खर्च कमी करण्यासाठी होमगार्डचे कामाचे दिवस कमी करण्यात येणार होते. मात्र, बारावीच्या परीक्षेनंतर होमगार्ड बंदोबस्तच बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
श्री. साळुंखे, होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी

Vertical Image:
English Headline:
homeguard out in settlements kokanmarathi news
Author Type:
External Author
राजेश शेळके
Search Functional Tags:
रत्नागिरी, आंदोलन, agitation, बेरोजगार, पोलिस, वर्षा, Varsha, सरकार, Government, विभाग, Sections, कोकण, Konkan
Twitter Publish:
Meta Keyword:
kokan homeguard news
Meta Description:
homeguard out in settlements kokan marathi news
 ‘निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन आंदोलन, सणासुदीचे बंदोबस्त आदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड आता बंदोबस्तात दिसणार नाहीत.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here