नागपूर : अनेकांना नाचायला आवडते. संगीताच्या तालावर बेभान होत नाचण्याचा आनंद वेगळाच असतो. अनेक जण नृत्याचे प्रशिक्षणही घेतात. चार चौघांत आपल्याला नाचता यावे हे त्यांचा उद्देश असतो. परंतु, नृत्यामुळे उत्तम व्यायाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? नृत्य केल्यामुळे शरीराला अनेक लाभही मिळतात. त्यामुळे फक्त मजेसाठी न नाचता व्यायामाचा एक प्रकार म्हणून त्याकडे पहा.

नाचल्यामुळे हृदयाला बळकटी मिळते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे तुम्ही उत्साहाने काम करू शकता.
नृत्य हा कार्डओव्हस्क्युलर व्यायामाचा एक प्रकार आहे. यामुळे तुमच्या शरीराची क्षमता म्हणजे स्टॅमिना वाढतो.
कोणतीही दुखापत टाळण्यासाठी स्नायू लवचीक असणे आवश्यक असते. नाचल्यामुळे स्नायू आणि सांधे लवचीक होतात तसेच सांधेदुखीही दूर राहते. नृत्यामुळे वाढलेली शारीरिक क्षमता दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडू शकते.
शारीरिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नृत्य उपयोगी पडू शकते. लहानपणापासून किंवा नियमित नृत्य करणाऱ्यांना उतारवयातही शारीरिक तोल सांभाळणे कठीण जात नाही.
नाचणे हा मेंदूसाठीही उत्तम खुराक ठरतो. नाचल्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. यामुळे उतारवयातल्या विस्मरणासारख्या समस्या फारशा भेडसावत नाहीत.
टॅप डान्सिंग हा मेंदूसाठी उत्तम व्यायाम ठरू शकतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here