कोणताही ट्रेडिशनल लूक करायचा असेल तर त्यावर एक छान डिझायन, भरजरी दुपट्टा घेतला की तुमचा नवा लूक तयार होतो. त्यामुळे सध्याच्या काळात अनेक मुलींकडे दुपट्ट्यांचं छान ट्रेंडी कलेक्शन असल्याचंही पाहायला मिळतं. अगदी कोणताही सण समारंभ असला की या दुपट्ट्यांमुळे एखाद्या ड्रेसचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. त्यामुळेच मुलींच्या वॉर्डरोबमध्ये कोणत्या प्रकारचे दुपट्टे असायला हवेत ते पाहुयात.
चिकनकारी दुपट्टा –
केवळ चिकनकारी सलवार सूटच नव्हे तर चिकनकारी वर्क केलेले दुपट्टेदेखील मुलींमध्ये लोकप्रिय आहेत. लाइट वेट आणि हलक्या रंगाचे हे दुपट्टे कोणत्याही प्लेन ड्रेसवर खुलून दिसतात.
फुलकारी दुपट्टा –
खासकरुन राजस्थान आणि पंजाब या भागात फुलकारी दुपट्टे पाहायला मिळतात. पटियाला सूटसोबत हे दुपट्टे छान दिसतात.
पॉम पॉम दुपट्टा –
ड्रेसपासून जीन्सपर्यंत अगदी कशावरही सहजपणे हा दुपट्टा कॅरी करता येतो. या दुपट्ट्यामध्ये प्लेन रंगाच्या दुपट्ट्याला कडेला लोकरीचे गोंडे लावलेले असतात.
हेवी नेट दुपट्टा –
साधारणपणे लेहंग्यावर असे दुपट्टे वापरले जातात. मात्र, लेहंग्याव्यतिरिक्त अनारकली, गाऊन किंवा नॉर्मल सलवार सूटवरही हे दुपट्टे वापरता येतात. हेवी नेट दुपट्ट्यामध्ये जाळीच्या ओढणीवर थोडं हेवी वर्क केलं जातं. यात काही टिकल्या, रंगीत खडे चिटकवले जातात.
बनारसी सिल्क दुपट्टा –
लग्नकार्यात साध्याशा ड्रेसला ट्रेडिशनल क्लासी लूक द्यायचा असेल तर बनारसी सिल्क दुपट्टा तुमच्याकडे असायलाच हवा. कोणत्याही गडद रंगाच्या प्लेन ड्रेसवर हा दुपट्टा छान दिसतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here