बॉलीवूडच्या अभिनेत्री या अभिनेत्यांशीच लग्न करतात. असा प्रेक्षकांचा सर्वसाधारण गैरसमज असतो. मात्र बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी उद्योगपतींशी लग्न केलं आहे. सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा एका वेगळ्या प्रकरणात पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे त्याच्या आणि शिल्पाच्या नावाची जोरदार चर्चा आहे. बॉलीवूडमध्ये अनेक अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनेते सोडून उद्योगपतींशी लग्न केलं आहे.

अमृतानं आपला कॉलेजचा मित्र शकील लडाकशी लग्न केलं. तो रेडस्टोन ग्रुपचा मालक आहे. जी एक मोठी कंस्ट्रक्शन कंपनी असून ती मुंबईमध्ये आहे. सध्या अमृता ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून कार्यरत असल्याचे दिसुन आले आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा ही तिच्या अभिनयासाठी प्रख्य़ात आहे. तिनं 2016 मध्ये जीन गुडेनफशी लग्न केलं. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. तिचा पती हा हायड्रोलिक पावर कंपनीचा उपाध्यक्ष आहे. जी कंपनी अमेरिकेमध्ये आहे.

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी अभिनेत्री टीना मुनीमनं लग्न केलं. अनिल अंबानी हे प्रसिद्ध उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे पुत्र आहेत. ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत.

बॉलीवूडमध्ये सलिनाला फारसा काही वाव मिळाला नाही. सध्या ती लाईम लाईटपासून दूर आहे. तिनं पीटर हागशी लग्न केलं. तो एक ऑस्ट्रीयन उद्योगपती आहे.

बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिनं आपला लहानपणीचा मित्र भरत तख्तानीशी लग्न केलं. तो हिऱ्यांचा व्यापारी आहे.

त्यावेळी जुही चावला एखाद्या बॉलीवूड अभिनेत्याशी लग्न करेल. असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तिनं एका बिझनेसमनशी लग्न केलं. तिनं 1995 मध्ये जय मेहता यांच्याशी लग्न केलं. ते इंग्लडमधील एक मोठे उद्योगपती आहेत

बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर ही देखील प्रख्यात अभिनेत्री आहे. ती वेगवेगळ्या सोशल उपक्रमांमध्येही अॅक्टिव्ह असते. तिनं लंडनमधील उद्योगपती आनंद अहुजा यांच्याशी लग्न केलं. त्यांचा विवाहसोहळा हा बांद्र्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये पार पडला.

सध्या बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीची म्हणजे राज कुंद्राची चर्चा आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. अजून राज हा न्यायालयीन कोठडीत आहे. राज हा जेव्हा दुबईमध्ये व्यापार करत होता, तेव्हा त्याची आणि शिल्पाची ओळख झाली होती.

2016 मध्ये असीननं तिच्या बॉय़फ्रेंडशी लग्न केलं. त्याचं नाव राहुल शर्मा असं आहे. तो मायक्रोमॅक्सचा को फाउंडर आहे. मायक्रोमॅक्स ही एक भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
Esakal