टोकियो : एकीकडे भव्यदिव्य स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना होत असलेला समारोप सोहळा आणि दुसरीकडे पुढची ऑलिंपिक होत असलेल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर तमाम फ्रान्सवासीयांच्या गर्दीत होत असलेला वेलकम सोहळ्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी झेप घेतल्याचा संदेश संपूर्ण जगाला दिला आणि तेथेच टोकियो ऑलिंपिक सुफल संपूर्ण झाले… (Tokiyo Olimpic 2020 News)

जगावर आदळलेल्या कोरोना संकटामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या टोकियो ऑलिंपिकचे शिवधनुष्य टोकियोने महामारीचा फेरा कायम असतानाही यशस्वीपणे पेलले. वेगवान, सामर्थ्यवान, उत्तुंग या बोध शब्दांमध्ये एकत्र या शब्दांचा समावेश करून जपानने कितीही संकटे आली तरी आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू या असा संदेश उद्‍घाटन सोहळ्यातून दिला होता. आज समारोपाच्या सोहळ्यातून पुढच्या पॅरिस ऑलिंपिकसाठी आशेचा किरण अधिक तेजोमय केला.

Also Read: Olympics: ही तर फक्त सुरूवात- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन

कोरोनामुळे जगात झालेल्या जीवितहानीमुळे टोकियोने उद्‍घाटन सोहळ्यात जल्लोषाचा कोणताही कार्यक्रम केला नव्हता. आजच्या समारोपाच्या सोहळ्यातही त्याचे भान ठेवण्यात आले, पण खेळाडू आणि टीव्हीच्या माध्यमातून हा सोहळा पाहणाऱ्यांचे मनोरंजनही केले. सोबत काही पारंपरिक नृत्ये होती; तर काही ब्रास ब्रँड आणि डीजे यांचाही ताल सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवणारा होता.

Also Read: IND vs ENG: पावसाने केला रंगाचा बेरंग; पहिली कसोटी अनिर्णित

खेळाडूंच्या परेडसाठी उपस्थित असलेल्या देशांचे एकेक खेळाडू प्रथम राष्ट्रध्वज घेऊन आले, त्यानंतर त्यांचे खेळाडू मैदानात आले. स्पर्धा संपलेली असल्यामुळे कोणतेही दडपण खेळाडूंवर नव्हते. पदक जिंकलेले खेळाडू पदक अभिमानाने गळ्यात घालून मिरवत होते; तर नायजेरियासारख्या काही देशांचे खेळाडू नाचगाणी करत होते. एकूणच खेळाडूंचा उत्साह स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याची ग्वाही देणारा होता.

ग्राफिकचा आविष्कार

समारोप सोहळा प्रेक्षकांविना होत असला तरी स्टेडियममध्ये प्रेक्षक नसल्याचे जाणवू दिले जात नव्हते. प्रकाशझोताच्या साह्याने प्रेक्षक असल्याचा आभास निर्माण केला जात होता. त्याच वेळी ग्राफिकच्या सह्याने स्टेडियमच्या रुफवरून धबधबा पडत असल्याचे दाखवण्यात आले. आभासी असलेले पाणी एकत्र वर गेले आणि त्यातून ऑलिंपिकची पाच वर्तुळे तयार झाली, हा ग्राफिकचा आविष्कार प्रेक्षणीय ठरला. उद्‍घाटन सोहळ्यात फुलाच्या आकारात ऑलिंपिक ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली होती. आज समारोप पूर्ण होत असताना फुलाच्या पाकळ्या बंद झाल्या आणि टोकियो ऑलिंपिक पार पडल्याचे दाखवण्यात आले.

Also Read: ‘गोल्ड’मॅन नीरजला CSK, BCCI कडून कोट्यवधींची बक्षीसे जाहीर

आयफेल टॉवरसमोर जल्लोष

पुढची ऑलिंपिक २०२४ मध्ये पॅरिस येथे होणार आहे. आज टोकियोत समारोपाचा कार्यक्रम सुरू असताना पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर ‘वेलकम’ सोहळा करण्यात आला होता. आयओसीचे प्रमुख थॉमस बाख यांनी ऑलिंपिक ध्वज टोकियोच्या पॅरिसच्या अॅना मारिया कोईकेने यांच्याकडे सूपूर्द केला आणि आयफेल टॉवरसमोर जल्लोष सुरू झाला. हवेत विमानांनी कसरती करून फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाचे रंग उधळण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात फ्रान्सवासीय उपस्थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here