

अनेक जणांना खिडकीमध्ये बसून वाचन करायची सवय असते. त्यामुळे ही खिडकी तुमचा उत्तम रिडिंग कॉर्नर होऊ शकते. फक्त ही खिडकी थोडीशी सजवण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे तुमचा हा रिडिंग कॉर्नर आकर्षक दिसेल. जर खिडकी मोठी असेल तर तेथे तुम्ही लहानशी गादी आणि उशा ठेऊ शकता. यात शक्यतो उशा व पडदे हे रंगीत असावे ज्यामुळे तुमचं मन कायम प्रसन्न राहिल.

अनेक जण दिवसभरातील काम आटोपून झाल्यावर रात्रीच्या वेळी वाचन करायला बसतात. परंतु, घरातील इतर लोक झोपल्यामुळे फार काळ लाइट चालू ठेवता येत नाही. त्यामुळे एक लहानसा टेबल लॅम्प नक्कीच तुमच्याकडे हवा.

खुर्चीमध्ये बराच काळ एकाच स्थितीत बसल्यामुळे पाय दुखायची शक्यता असते. त्यामुळे कधीही वाचन किंवा लिखाण करताना फूट स्टूलचा आधार घ्यावा. सध्या मार्केट वेगवगेळ्या स्टाइल आणि डिझाइनचे फूट स्टूल उपलब्ध आहेत.

टेबल-खुर्चीशिवाय तुमचा रिडिंग कॉर्नर अपूर्णच आहे. परंतु, टेबल रिकामा ठेवण्यापेक्षा त्यावर लहान लहान रोपटी, घड्याळ, पाण्याची बाटली असं साहित्य ठेवावं.
Esakal