राजापूर (रत्नागिरी) : रोजगार मिळवून देणारे प्रकल्प स्थानिक जनतेला हवे आहेत. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा आहे. मात्र, रोजगार निर्मिती करणाऱ्या रिफायनरीसारख्या प्रकल्पाला विरोध करून आमच्या मुलांच्या हातामध्ये भविष्यात करवंट्या देणार आहात का, असा सवाल शिवसेनेचे सागवेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले शिवसैनिक असून बाहेरून पक्षात आलेल्या उपऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोलाही त्यांनी हाणला.
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या भूमिकेवरून शिवसेनेमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. त्यातून पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाली आहे. प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या सागवेच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेना नेतृत्वाने कारवाईही केली आहे. काल (ता.२३) रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सेनेचे उपनेते उदय
हेही वाचा- राणे बंधुना दिली या पदाची महत्वपूर्ण जबाबदारी…
उपऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये
सामंत यांनी रिफायनरी कंपनीच्या किंवा काही लोकांच्या आहारी जावून जे शिवसैनिक काम करीत असतील त्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. त्या पार्श्वभूमीवर काजवे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आपली रोखठोक भूमिका मांडली.
काजवे म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा आहे. त्यातून आम्ही प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतली आहे. मात्र, प्रकल्पाला येथील जनतेचा शंभर टक्के विरोध नसताना काही नेते मात्र, विरोधाचे चित्र निर्माण करीत आहे. यामागचे नेमके इंगीत काय ?
हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा…
आम्ही शिवसेना सोडलेली नाही
आम्ही प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी रत्नागिरी येथे येणारी फाइव्ह स्टार एमआयडीसी का व कशी गेली, याचा विचार करावा. आम्ही अद्यापही शिवसेना सोडलेली नाही. जनतेच्या विकासाच्या मागणीसाठी राजीनामे दिले आहेत. केवळ फायद्यासाठी शिवसेनेत आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. प्रदूषणाच्या नावाखाली प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी पर्यावरणपूरक किती प्रकल्प कोकणात आणले आणि लोकांना रोजगार दिला,असा सवाल त्यानी केला.

News Story Feeds