जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरच्या क्षणाला केलेल्या गोल्डन कामगिरीच्या जोरावर अमेरिका जगात भारी ठरले. ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून चीन सर्वाधिक गोल्डसह अव्वलस्थानावर मक्तेदारी गाजवण्याची चिन्हे दिसत होती. मात्र अखेरच्या क्षणाला चीनला धोबीपछाड देत अमेरिकेने बाजी मारली. 39 गोल्डसह अमेरिकेने सर्वाधिक 113 मेडलची कमाई केली. चीन 38, यजमान जपान 27 आणि ग्रेट ब्रिटन 22 गोल्डसह अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले.

भालाफेकपटू नीरज चोप्राच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अखेरच्या टप्प्यात भारताला सोनेरी क्षणाची अनुभूती मिळाली. त्याने मिळवलेल्या गोल्डसह भारताने 2 सिल्वर आणि 4 ब्राँझ मेडलसह एकूण 7 मेडल मिळवली. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील भारताची ही सर्वोच्च कामगिरी ठरलीये. भारत पदतालिकेत 48 व्या स्थानावर राहिला. एवढेच नाही तर अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच भारताला गोल्ड मिळाले आहे.

Also Read: खेळाडूंचा ‘मानसिक खेळ’

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एक सिल्वर आणि एक ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसरे पदक मिळवून बॅडमिंटनमधील भारताची ताकद कायम असल्याचे दाखवून दिले. वेटलिफ्टिंगप्रकारात मीराबाई चानूने तर कुस्तीमध्ये रवि कुमार दाहियाने चंदेरी कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये पदार्पणातच लवलिना हिने ब्राँझ पदकाची कमाई केली. तिच्याशिवाय बजरंग पुनिया आणि भारतीय पुरुष हॉकी संघानेही ब्राँझ पदक मिळवत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीत मोलाचा वाटा उचलला.

Also Read: डोळ्यातून अश्रू आले नाहीत, पण त्यावेळी मी खूप भावूक झालो होतो – नीरज चोप्रा

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी पदतालिकेत चीन 38-36 असे आघाडीवर होते. पण स्पर्धेतील अखेरच्या क्षणाला अमेरिकेने 3 गोल्ड मेडल मिळवत पदतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली. फायनल डे दिवशी चीन रेसमध्ये नव्हते. त्यामुळे त्यांना अव्वलस्थान गमवावे लागले. अमेरिकेने महिला बास्केटबॉलमध्ये सुवर्ण कामगिरी नोंदवत आघाडीवर असलेल्या चीनमधील अंतर कमी केले. सायकलिंगमध्ये जेनिफरने अमेरिकेच्या खात्यात गोल्डची भर घालत चीनची बरोबरी केली आणि त्यानंतर व्हॉलिबॉलमध्ये अमेरिकन महिला संघाने फायनल बाजी मारत अमेरिकेला गुणतालिकेत टॉपला नेले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here