लिपस्टिक ही संपूर्ण मेकअप ला पूर्ण टच देण्याचं काम करते. लिपस्टिक खरेदी करताना कोणती लिपस्टिक आपल्याला शोभून दिसेल, याबाबतीत अनेकदा गोंधळ उडतो. केमिकल मिश्रित मेकअपची उत्पादनेही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे योग्य उत्पादनाची निवड करण्यासाठी या काही खास टिप्स जाणून घ्या…

लिपस्टिक लावण्यापूर्वी पेट्रोलियम जेली किंवा लीप बाम लावावा. यामुळे दुष्परिणाम कमी होतात.
लिपस्टिक खरेदी करताना, हानिकारक उत्पादनाविषयी माहिती करून घ्या.
क्रीम लिपस्टिक, मॅट टच, फ्रॉस्ट फिनिश आणि शिमर लिपस्टिक असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
नेहमीच चांगल्या ब्रॅंडची लिपस्टिक खरेदी करा. जेणेकरून आरोग्यास कमी हानी पोहोचू शकेल.
लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी ती एकदा चेक करून पाहा.
तुमच्या ओठांच्या आणि चेहऱ्याच्या रंगाशी मिळताजुळता रंग असलेली लिपस्टिक निवडा.
नेहमी डार्क रंगाची लिपस्टिक खरेदी करणे टाळा. कारण अशा लिपस्टिकमध्ये जड धातूचे प्रमाण अधिक असते.
लिपस्टिक खरेदी करताना त्यावरील एक्स्पायरी डेट तपासा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here