अभिनेता अक्षय कुमारचा Akshay Kumar आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ Bell Bottom हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ त्याने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सेटवर पत्नी ट्विंकल खन्ना Twinkle Khanna हजर राहणार असल्याने त्याने अॅक्शन सीन्स करण्यासाठी अधिक मेहनत केल्याचं या व्हिडीओत कबुल केलं. “आम्हाला एकत्र राहून २० वर्षे पूर्ण झाली, तरीसुद्धा तिला इम्प्रेस करण्यासाठी मी सेटवर अधिक मेहनत घेत होतो. स्टंटमधील बारकाव्यांकडे अधिक लक्ष देत होतो”, असं तो म्हणाला. मात्र हा व्हिडीओ पाहून ट्विंकलने मात्र त्याला त्याचे स्टंट्स थांबवण्याची विनंती केली आहे. अक्षयच्या या व्हिडीओवरील ट्विंकल खन्नाच्या कमेंटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

ट्विंकलवर आपला प्रभाव पाडण्यासाठी स्टंट्स करताना अधिक मेहनत घेतल्याचं अक्षय सांगत असताना ट्विंकलने कमेंटमध्ये हात जोडून विनंती केली. ‘मी इम्प्रेस झाले. आता तरी तू हे स्टंट्स करणं थांबवशील का?’, असा सवाल तिने कमेंटमध्ये पोस्ट केला आहे. त्यासोबतच तिने हात जोडलेला आणि हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. “जेव्हा जेव्हा तो इमारतींवरून उड्या मारतो किंवा विमान, हेलिकॉप्टरवर स्टंट्स करतो, तेव्हा मला खूप भीती वाटते. एवढं सगळं करूनसुद्धा तो सुखरुप असल्याच्या गोष्टीनेच मी जास्त प्रभावित होते. सुरक्षित रहा मिस्टर के”, असं तिने म्हटलं.

Also Read: ‘बेल बॉटम’च्या मानधनाच्या चर्चांवर अक्षय कुमारचा खुलासा

Also Read: कपिल शर्माच्या का पाया पडला अक्षय कुमार?

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट येत्या १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देखमुख, मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली असून रंजित तिवारी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात अक्षयसोबत हुमा कुरेशी आणि लारा दत्ता भुपती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यामध्ये अक्षय रॉ (RAW) एजंटची भूमिका साकारत आहे. १९८०च्या दशकात झालेल्या विमान हायजॅकिंग्सवर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटात लारा दत्ता ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री वाणी कपूर पडद्यावर अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here