सोशल मीडियावर काल दुपारपासून कुत्र्याचे झाडाला लटकलेले शरीराचे अवयव यांचे व्हिडीओ फिरत आहेत.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): गिरणा पट्ट्यात बिबट्याचे (Leopards Attack) वास्तव कायम आहे.काही दिवसापूर्वी वरखेडे भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा उपद्रव मध्यंतरी कमी झाला असतांना आता भऊर (ता.चाळीसगाव) शिवारात बिबट्याचा रहिवास दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या शिवारात बिबट्याने एका कुत्र्याला ओढून नेत त्याची शिकार केली. कुत्र्याचे चक्क अर्धे धड झाडाला लटकलेेले तर अर्धे धड जमिनीवर आढळून आले. हा प्रकार शेतकऱ्यांनी (Farmer) पाहताच एकच खळबळ उडाली आहे.

Also Read: ऐन संकटात शेतीचा विज पुरवठा खंडीत;शेतकरी हवालदील

Leopards

भऊर (ता.चाळीसगाव)परिसरातही आता बिबट्याचे दर्शन होवू लागले आहे. रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एकनाथ गुंजाळ यांनी त्यांच्या शेतात प्रत्यक्ष झाडावर बसलेला बिबटया पाहीला. त्यानंतर काही वेळातच साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने त्यांच्या शेतातील कुत्र्याचा फडशा पाडला. विशेष म्हणजे बिबट्याने कुत्र्याला शेतातून ओढून नेत एका झाडावर नेले. तेथे त्याने त्याची शिकार केली.कुत्र्याचा फडशा पाडतांना कुत्र्याचे अर्धे धड झाडाला लटकलेले तर अर्धे शरीर जमिनीवर पडलेले आढळून आले. हा प्रकार समोर येताच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Also Read: ऊजैनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोन जणांचा मृत्यू

एकनाथ गुंजाळ यांच्या शेताच्या आजुबाजुला उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच बाजुला गिरणा नदी असल्याने बिबट्यासाठी ही सुरक्षीत जागा असल्याचे दिसून येते.मात्र या भागात बिबट्याचा रहिवास आहे का याबाबत वन विभागाकडून अद्यापतरी दुजोरा मिळू शकला नाही. परंतू कुत्र्याचा ज्या प्रकारे फडशा पाडलेला दिसला ते पाहता हे काम बिबट्याच करू शकतो असे या परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Also Read: पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात

सोशल मिडीयावर व्हाँयरल

सोशल मीडियावर काल दुपारपासून कुत्र्याचे झाडाला लटकलेले शरीराचे अवयव यांचे व्हिडीओ फिरत आहेत. यामुळे एकच चर्चा ही सोशल मीडियावर होतांना काल दिसुन आली.काही दिवसापूर्वी वरखेडे परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्याने कुत्र्यांसह बकऱ्यांचा फडशा पाडला होता. गेल्या 15 ते 20 दिवसापासून बिबट्याचे दर्शन झाले नसल्याने या भागातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांंनी सुस्कारा सोडला असतांना आता भऊर भागात बिबट्या दिसल्याने व शिकारीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हाँयरल झाल्याने एकच चर्चा रंगली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here