आपण कोणत्याही पर्यटन क्षेत्राला भेट देताना तेथील एक आठवण म्हणून तेथे फोटो आवर्जून काढतो. ते फोटो आपण सोशल मीडियावर शेअर करतो. मात्र जगभरात अशीही काही स्थळं आहेत, जिथे फोटो काढण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि अशीही काही ठिकाणं आहेत जिथे फोटो काढायला सक्त मनाई आहे. पाहुयात ही ठिकाणं कोणती आहेत?

सिस्टिन चॅपल, इटली: इटलीमधील सिस्टिन चॅपलमध्ये पर्यटकांना फोटो काढण्यास बंदी आहे. या मागे फक्त धार्मिक कारण नसून काही वेगळी कारणे सुद्धा आहेत. जपानमधील टेलिव्हिजन नेटवर्क कॉर्पोरेशनने सुमारे 20 वर्षांपूर्वी कलाकृतींच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले होते. त्यामुळे या ठिकाणचे छायाचित्रण आणि व्हिडिओ काढण्याचे विशेष अधिकार त्यांना मिळाले.
अलामो, यूएस: या ठिकाणी पर्यटकांना फोटो काढण्यास परवानगी नसून येथे मोठ्या आवाजात बोलण्यावरही बंदी आहे.
व्हॅली ऑफ द किंग्ज, इजिप्त: इजिप्तमधील किंग्ज व्हॅलीमध्ये जो कोणी कॅमेरा घेऊन जाईल त्याला E £ 2,000 (११५ युएस डॉलर्स) इतका दंड आकारला जातो.
ताज महाल, भारत: तुम्ही जर ताज महालला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा नियम माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही ताज महालच्या बाहेर हवे तितके फोटो काढू शकता. पण ताज महालच्या आत फोटो काढणे हे त्याचा अपमान करण्यासारखे मानले जाते.
उलुरू-काटा तजुटा राष्ट्रीय उद्यान, ऑस्ट्रेलिया: हे ऑस्ट्रेलियामधील सर्वांत प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे पर्यटकांना फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
गोल्डन गाई, जपान: जर तुम्हाला टोकियोची समृद्ध परंपरा पहायची असेल तर या ठिकाणाला भेट द्या पण या ठिकाणी फोटो काढायला बंदी आहे.
ज्वेल हाऊस, यूके; ज्वेल हाऊस हे असे प्रेक्षणिय स्थळ आहे जिथे 100 हून अधिक सिसिटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. येथे भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अनेक सुरक्षारक्षक लक्ष ठेवून असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here