मुंबई: महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही नियम तयार केले. तसेच, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली जाऊ नये असे आदेशही दिले. पण भाजपच्या काही नेतेमंडळींनी मात्र, यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. हे सरकार एका विशिष्ट धर्माच्या विरोधात वागत आहे, असा आरोप विरोधकांनी केला. यावर, “राज्य सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे असा भाजपचा आरोप असेल, तर मग पंतप्रधान मोदी जे बोलत आहेत ते सर्व धर्मांच्या विरोधात बोलत आहेत का”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना उपस्थित केला.

Also Read: आमदाराने मुलीच्या लग्नातला खर्च वाचवला; राबवली लसीकरण मोहीम

“महाविकास आघाडीचे सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे असा भाजपचा आरोप असेल. तर मग पंतप्रधान मोदी हे जे काही मन की बातच्या माध्यमातून बोलले आहेत, ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत, असं भाजपच्या राज्यातील नेत्यांना म्हणायचंय का? सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे, तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? जर अशीच भूमिका भाजप आमदारांची असेल, तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नाही”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

Also Read: श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी तुंगारेश्वर, निर्मळ मंदिर बंद

Nawab Malik

“जो नेता सुप्रीम कोर्टाचा आदर करत नसेल, स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल, त्यांचं लोकं किती ऐकतील? देशाचे पंतप्रधान मन की बात मध्ये भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे, असे सांगतात. पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सणासुदीला गर्दी करु नका, याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे असे निर्देश दिले होते. असे असताना भाजपचे आमदार अशी वक्तव्य करत आहे. हे योग्य नाही”, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here