टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करुन मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. गोल्डन बॉय नीरज चोप्रा, रवि दाहिया, बजरंग पुनिया यांच्यासह हॉकी टिमच्या संदस्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर खास तयारी करण्यात आली होती.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्डन क्षणाची अनुभूती दिली.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री रिजिजू यांच्यासोबत नीरज चोप्रा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून मायदेशी परतलेल्या खेळाडूंचा खास सत्कार कण्यात आला.
दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर नीरज चोप्राने गोल्ड मेडल दाखवत स्वागतासाठी जमलेल्या सर्वांचे आभार मानले.
कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॉक्सर लवलिना, नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवि दाहिया यासह अन्य खेळाडू खास कार्यक्रमाला यावेळी उपस्थितीत होते.
मायदेशी परतल्यानंतर गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि रौप्य पदक विजेता कुस्तीपटू राहूल दाहिया यांनी खास पोझ दिल्याचे पाहायला मिळाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here