श्रावण व त्यातला सोमवार म्हटले लाखो शिवभक्त शिवनामाच्या गजरात तल्लीन होतात. याकाळात पंचवटीतील शिवमंदिरांसह अन्य छोट्या मोठ्या मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी उसळते. याकाळात नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या आवारात तर पाय ठेवायलाही जागा नसते. परंतु गरवर्षीप्रमाणेच यंदाही देऊळबंदीच कायम असल्याने अनेकांचा हिरमोड झाला.





Esakal