रत्नागिरी : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरांत गॅस जोडणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असताना जिल्ह्यात १ लाख १८ हजार ९८१ कुटुंबे अजूनही गॅसविना आहेत. आजही त्यांना चूल पेटवावी लागते. यांपैकी ९६ हजार ९५ कुटुंबांनी याबाबतचे हमीपत्रदेखील पुरवठा विभागाकडे सादर केले आहे. त्यांना रॉकेल पुरवण्यासाठी महिन्याला १२ हजार लिटरचे ३० टॅंकर मागवावे लागत आहेत. पूर्वी ७० टॅंकर मागवावे लागत होते.
गॅसची जोडणी नसलेल्या कुटुंबांनाच यापुढील काळात रॉकेलचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मंजूर रॉकेलचा कोटा मिळावा, यासाठी कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र घेतले जात आहे. पॉस मशिनद्वारे किंवा त्याशिवाय रॉकेल घेणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांना स्वत:च्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे. खोटे हमीपत्र दिल्यास फौजदारी कारवाईची तरतूद आहे. सरकारने रेशनकार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या निळ्या रॉकेलच्या वापरावर लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा- रत्नागिरीतील ४६० होमगार्ड होणार बेरोजगार का ते वाचा…?
खोटे हमीपत्र दिल्यास फौजदारी
अनेक ठिकाणी गॅस असूनही आमच्याकडे गॅस नाही, असे खोटे सांगून शिधापत्रिकेवर गॅसचा शिक्का मारून दिला जात नाही. गॅस जोडणी असलेल्या कुटुंबांना रॉकेल न देण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास पुरवठा विभागाने सुरुवात केली. त्यासाठी पॉस मशिनवरून रॉकेलचे वाटप सुरू झाले. आता हमीपत्र घेऊनच रॉकेलचे वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत.
हेही वाचा- मोठ्या लिपीत अडकली न्यायाधीशाची डिग्री….
आम्ही घेतलेल्या आढाव्यामध्ये जिल्ह्यात अजूनही १ लाख १८ हजार ९८१ लोक गॅसविना आहेत. त्यांपैकी हमीपत्रे सादर केलेली ९६ हजार ९५ कुटुंबे असून त्यांना रॉकेल पुरवठा केला जातो.
–महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी.
हमीपत्रे सादर केलेली तालुकानिहाय कुटुंबे
मंडणगड* ४ हजार ७२०
दापोली* ७ हजार १०७
खेड* ९ हजार ६५९
गुहागर* ८ हजार ६७१
चिपळूण* ९ हजार ३१५
संगमेश्वर* १४ हजार १६०
रत्नागिरी* १६ हजार ९०४
लांजा* १० हजार ७५
राजापूर* १५ हजार ४८४.
९६ हजार ९५ जणांची मागणी
एकूण ४ लाख २७ हजार ८७१ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांपैकी ३ लाख ८ हजार ८९० लोकांकडे गॅस जोडणी आहे, तर १ लाख १८ हजार ९८१ लोकांपर्यंत अजून गॅस जोडणी पोचलेली नाही. ९६ हजार ९५ जणांनी हमीपत्र देऊन रॉकेल मिळावे, अशी मागणी केली आहे.

News Story Feeds