मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील काही मालिका अचानक बंद होणार आहेत. यापैकी काही मालिका या कथेतील पूर्णतेमुळे बंद होणार आहेत तर काही मालिका टीआरपी न मिळाल्याने प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

देवमाणूस- मराठीतील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षभरापासून या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेता किरण गायकवाडने यात मुख्य भूमिका साकारली.
माझा होशील ना- मालिकेतील आदित्य आणि सई यांच्या केमिस्ट्रीने जरी प्रेक्षकांची मनं जिंकली असली तरी ही मालिका लवकरच आपला गाशा गुंडाळणार आहे. मालिकेला अपेक्षित टीआरपी मिळत नसल्याने निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आई माझी काळुबाई- ही मालिका विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिली. मालिकेच्या सेटवर कोरोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मालिका मध्यातच सोडली. प्राजक्ताची जागा वीणा जगतापने घेतली. मात्र तिनेही ही मालिका अर्ध्यावरच सोडली. अखेर रश्मी अनपटने मुख्य भूमिका साकारली. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
अग्गंबाई सुनबाई- ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला जितकं यश मिळालं तितकं त्याच्या दुसऱ्या भागाला मिळू शकलं नाही. यामध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, अद्वैत दादरकर आणि उमा पेंढारकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
पाहिले न मी तुला- तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी आणि शशांक केतकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका लवकरच बंद होणार आहे. या मालिकेत शशांकने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली. ही मालिका बंद होण्यामागेही टीआरपीचं कारण आहे.
कारभारी लयभारी- गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेला अपेक्षित यश मिळत नाहीये. यामुळे निर्मात्यांना ही मालिका बंद करावी लागत आहे. यात अंकुशा सरकाते आणि निखिल चव्हाण यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here