ऑलिम्पिक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात भारताचा तरणाबांड नीरज चोप्रा याने इतिहास रचला. त्याने यंदाच्या स्पर्धेत भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचा सन्मान वाढवणारे भालाफेकपटू नीरज चोप्राची जबरदस्त फिटनेस कोणापासूनही लपलेली नाही.

या जबरदस्त फिटनेसच्या बळावर नीरजने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आता नीरजचे वर्कआउट आणि फिटनेस सेशनचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ऑलिम्पिकसाठी नीरजने किती मेहनत घेतली ती दिसेल.

नीरजच्या वर्कआउटमध्ये तुम्हाला भारी बॉडी- बिल्डिंग किंवा वेट लिफ्टिंग पाहायला मिळणार नाही. उलट, तो त्याच्या शरीराच्या (फ्लेक्सिब्लिटी) लवचिकतेवर अधिक काम करतो.
नीरजच्या मते, टूर्नामेंट किंवा सामन्यांच्या वेळी तो जास्त फॅटचे पदार्थ खाण्यापासून दूर राहतो. या दरम्यान, ते सॅलड किंवा फळांसारख्या गोष्टींचा जास्त वापर करतो. तो आहारात उकडलेले अंडे आणि ग्रील्ड चिकन ब्रेस्ट देखील खातो. या सर्व गोष्टींमधून त्यांच्या शरीराला पुरेसे प्रोटीन मिळतात.
नीरजने सांगितले होते की, तो साल्मन फिश खातो. आरोग्यासाठी ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ती आपल्या आहारात समाविष्ट केली आहे.
याशिवाय, त्याला ब्रेड ऑमलेट, नमकीन राईस आणि आईच्या हाताने बनवलेला चूरमा देखील खूप आवडतो. त्याच्या वर्कआउट सेशननंतर ताजी फळे आणि ज्यूस घ्यायला तो कधीच विसरत नाही.
असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यात नीरज बॅरियर जंप करताना दिसत आहे. ही एक्सरसाइज नीरजची बॉडी फ्लेक्सिबल (लवचिक) ठेवण्यासाठी देखील काम करतो.
तज्ञांचे म्हणणे आहे की, खेळाडूचे शरीर जितके फ्लेक्सिबल (लवचिक) असेल तितकेच त्याला दुखापत होण्याची शक्यता कमी असते.
एका व्हिडिओमध्ये नीरज घरी रनिंग, पुलअप्स, पुशअप्स आणि एब्सची एक्सरसाइज करताना दिसत आहे. नीरजने हे सिद्ध केले की कोणीही कोणत्याही उपकरणाशिवाय घरी स्वतःला फिट ठेवू शकतो.
यामध्ये नीरज जी एक्सरसाइज करत आहे त्याला ‘ड्रॅगन फ्लॅग’ म्हणतात. या वर्कआउटमध्ये दोन्ही पाय 90 डिग्री पर्यंत घेतल्यानंतर ते हळूहळू फ्लॅट केले जातात, जे खूप कठीण काम आहे.
आपल्या शरीराचे संपूर्ण वजन पायांवर अवलंबून असते आणि जर पाय कमकुवत असतील तर शरीराचा वरचा भाग मजबूत कसा होऊ शकतो. म्हणूनच नीरज चोप्रा पाय मजबूत करण्यासाठी खूप स्क्वाट्स करतो. या व्यतिरिक्त, तो बेंच प्रेस, शोल्डर, ट्राइसेप्स आणि बायसेप्स देखील चांगला ट्रेंड करतो.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here