सांगली : राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील (paschim maharashtra) अनेक जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर या आपत्तींत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या (farmers loan) रकमेत वाढ झाली आहे. मात्र यंदाही आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेला आर्थिक फटका बसला आहे. यामुळे विरोधकांकडून या प्रकरणी टीका होत आहे. कधीही पूर्णपणे अमंलात न येणारी योजना म्हणजे महाविकास आघाडी सरकारची (mahavikas aaghadi sarkar) कर्जमाफी योजना अशी खोचक प्रतिक्रीया शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधित ट्विट केले आहे.

Also Read: जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचे बिगुल सप्टेंबरमध्ये वाजणार?

ते म्हणतात, महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना कधीही पूर्णपणे अमंलात न येणारी आहे. शेतकरी वेगवेगळ्या संकटांना तोंड देत असताना सरकारने त्यांच्या कर्जमाफीसाठी केवळ 150 कोटींची तरतूद केली आहे. ही तरतुद म्हणजे पुन्हा एकदा कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांसोबत केलेला दगा आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

Also Read: लाचलुचपतची धडक कारवाई; लेखाधिकारी कार्यालयातील दोघेजण जाळ्यात

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७०० कोटी रुपयांची आवश्यकता असताना १५० कोटींची तरतूद केल्याने सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना निधीअभावी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here