नागपूर : भारतीय आहारात वापरले जाणारे अनेक पदार्थ आरोग्यासाठीही लाभदायक असतात. त्यामध्ये हळद, आले, लसूण आदी अनेक पदार्थांचा व मसाल्यांचा समावेश होतो. भारतात पाच हजारांपेक्षाही अधिक वर्षांपासून लसणाचा आहारात वापर होत आला आहे. लसूण पदार्थांचा स्वाद वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही बहुगुणी ठरतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चला तर जाणून घेऊया याच्या लाभाबद्दल…

लसणामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे तसेच आयोडीन, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असे पोषक घटक असतात. लसणामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणही आहेत.
लसणामुळे शरीरातील इन्शुलीनचा स्तर वाढवतो व मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते लाभदायक ठरते.
लसूण कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. रक्ताचे शुद्धीकरण व रक्त पातळ होण्यासही मदत होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत.
लसूण हृदयाला फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतो. रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
लसणात अँटिइन्फ्मेटरी गुणही आहेत. त्यामुळे ॲलर्जीची समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
वजन घटवणे, सांधेदुखी दूर करणे आदींसाठीही लसणाचा उपयोगी होतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here