कात्रज : पुण्याचे (pune) दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रज (katraj) घाटाला गतवैभव प्राप्त झाले आहे. कात्रज घाटात सातत्याने कचरा टाकला जात असल्याने घाटाची कचराकुंडी झाली होती. त्यानंतर सकाळकडून (sakal media) यासंबंधी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या गोष्टीला २३ गावांच्या महापालिकेतील 9pune coporation) समावेशानंतर यश आले आहे. (sakal impact Katraj Ghat gets glory)
१ जुलै २०२१पासून २३ गावे पुणे शहराच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली. त्यापैकी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मांगडेवाडी, भिलारेवाडी या कात्रज घाटानजीक गावांचा समावेश करण्यात आला. सदर गावांचा क्षेत्रिय कार्यालयाने ताबा घेतल्यानंतर २ जुलैपासून कात्रज जुना व नवीन घाट स्वच्छता करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर कात्रजघाट चकाचक करण्यात आला आहे.
Also Read: कात्रज घाटातून प्रवास करताय तर नाकाला लावावा लागेल रुमाल
वर्षानुवर्ष घाटात पडलेला कचरा उचलण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाला कॉम्पॅक्टर गाडी, छोटा हत्ती, कंटेनर व एका घंटा गाडीची गरज लागली. या गाड्यांमार्फत एकूण ३० ते ३५ टन कचरा उचलून घेण्यात आला. सदरचे काम धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नरेंद्र भालेराव, राजू दुल्लम, आरोग्य निरीक्षक नितीन राजगुरू, प्रमोद ढसाळ यांच्या नियंत्रणाखाली समाविष्ट गावातील ग्रामपंचायत सेवक व धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडील ५० ते ६० सेवकांनी मिळून हे काम केले. या व्यतिरिक्त मुख्य खात्यांमार्फत राडारोडा उचलून नेण्यात आला. यासाठी एकूण ४२ हायवा गाड्या लागल्या.

Also Read: कात्रज घाटातील कचरा घेण्यास महापालिकेच्या घनकचरा विभागाचा नकार
क्षेत्रिय कार्यालयांकडून आवाहन
समाविष्ट गावांमध्ये खाजगी यंत्रणेमार्फत घरोघरी ओला व सुका कचरा गोळा करण्यासोबत गावांतील व्यावसायिकांकडूनही ओला व सुका कचरा वेगळा करून घेण्यात येत आहे. त्यामुळे या लोकांकडून घाटात कचरा पडणे बंद झाले आहे. परंतु, शहराच्या विविध भागातून नागरिक व व्यवसायिक दुचाकी, चारचाकी घेऊन कचरा टाकण्यासाठी घाटात येतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे धनकवडी क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त यांच्याकडून कात्रजघाट हा पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार आहे. घाटास ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे नागरिकांनी घाटात कचरा टाकण्यासाठी येऊ नये व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
Also Read: #PuneRains कात्रज घाटात राडारोडा
‘सध्या घाटामध्ये दोन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिका समावेशापासून १० ऑगस्टपर्यंत जवळपास १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा पडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे,’ असे आरोग्य निरिक्षक प्रमोद ढसाळ यांनी सांगितले.
Esakal