बैठकीत जळगाव महानगर गाळेधारक व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका गाळेधारकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
जळगाव ः जळगाव महानगर पालिकच्या (Jalgaon Municipal Corporation) मुदत संपलेल्या गाळेभाडे प्रश्नी ( Shop Rent Problem) गाळेधारक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जावून नगरविकास मंत्री तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Committee President Nana Patole) यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या. तसेच यावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करून पर्याय देखील सुचविले आहे. याबाबत मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली.
Also Read: PHOTO:बहिणाबाई चौधरींच्या स्मारकाची अवहेलना थांबवा-खासदार पाटील
जळगाव महापालिका गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी मुंबई येथे पाचोरा चे आमदार किशोर पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले तसेच नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. ह्या वेळेस केमीट संघटनाचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल हे सुद्धा उपस्थित होते. नाना पटोले यांनी दूरध्वनी वरुन आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली तसेच ह्या विषयात गाळेधारकांना पूर्ण सहकार्य करेल व मी गाळेधारकांना सोबत आहे असे आश्वासन दिले. तसेच नाना पटोले यांनी नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

नगरविकास मंत्री सोबत चर्चा
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार किशोर पाटील यांनी गाळेधारकांची बैठक करून दिली. या बैठकीत जळगाव महानगर गाळेधारक व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका गाळेधारकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. 13 सप्टेंबर 2019 च्या जीआर मध्ये दुरुस्ती करण्याबाबत चर्चा, तसेच 12 मे 2021 रोजी 458 नंबर ठराव झालेला आहे त्याच्यावर नगर विकास मंत्र्यांकडे गाळेधारक संघटनेतर्फे अपील दाखल करण्यात आली.
Also Read: मंगळसुत्र लांबविले तरी सराफाला पत्ता नाही;सीसीटीव्हीतून सत्य आले समोर
आयुक्तांशी केला चर्चा
नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा केली. गाळेधारकांचे हिताचे तसेच महानगरपालिकाचे नुकसान होणार नाही अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यात येईल असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले.
Esakal