बॉलिवूडमध्ये ट्रॅव्हलिंग या विषयावर आधारित अनेक चित्रपट आहेत. पाहूयात असे चित्रपट ज्यांना पाहिल्यानंतर अनेकांना फिरायला जाण्याचा मोह आवरणार नाही…

2015 मध्ये प्रदर्शित झालेला दीपिका पादूकोण आणि रणबीर कपूरचा ‘तमाशा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या बकेट लिस्टमध्ये फ्रान्समधील कोर्सिका बेट हे ठिकाण सामिल होतील. या चित्रपटामधील दाखवण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.
‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ हा चित्रपट अशा 3 मित्रांचा आहे, जे अनेक वर्षांनी एकत्र एका ट्रिपला जातात. त्या ट्रिपमध्ये येणारी मजा मस्ती या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटामध्ये स्पेनमधील ‘बुल रन’ आणि ‘ला टोमाटिना’ हे फेस्टिव्हल दाखलवण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहून तुम्हाला देखील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत ट्रिपला जावेसे नक्की वाटेल.
अनेक महिलांमध्ये सोलो ट्रिपला जायची इच्छा असते पण काही जण एकटे ट्रिपला जायला घाबरतात.अशांनी एकदा तरी ‘क्वीन’ हा चित्रपट पहावा. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये कंगना राणावतने प्रमुख भूमिका साकारली आहे.
2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपटात दीपिका पादूकोण आणि रणबीर कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये हिमाचल प्रदेश आणि गुलमर्गमधील सुंदर पर्यटन स्थळे दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटातील निसर्गरम्य ठिकाणांना पाहून अनेकांना इथे एकदातरी भेट द्यावी वाटेल.
दिल्ली ते कोलकाता हा प्रवास 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिकू’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला. दीपिका अमिताभ बच्चन, इरफान खान या कलाकारांची दिल्ली ते कोलकता रोड ट्रिप या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here