नवी दिल्ली : जगभरात आफ्रिकेचा (africa) अपवाद वगळता जंगलचा राजा समजल्या जाणाऱ्या सिहांची (lion) संख्या घटत आहे. मात्र, भारतात (india) विशेषत: गुजरातेतील (gujrat) गीर अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून सिंहांची संख्या स्थिर गतीने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनीही जागतिक सिंह दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना याचा गौरवाने उल्लेख केला. (india forest king lion)
‘सिंह रुबाबदार आणि धाडसी आहे. आशियाई सिंहांचे वसतिस्थान असल्याचा भारताला सार्थ अभिमान आहे. जागतिक सिंह दिनानिमित्त सिंहांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत भारतात सिंहांच्या संख्येत स्थिर गतीने वाढ झाली आहे, हे वृत्त तुमच्यासाठी आनंददायक आहे,’ असे ट्विट मोदी यांनी केले. गुजरातेतील गीर अभयारण्यात सिंहांच्या संख्येत २९ टक्के वाढ झाली आहे. २०२० मध्ये गीरमध्ये ६७४ सिंहांची नोंद झाली. दरवर्षी १० ऑगस्ट हा दिवस सिंहांच्या संवर्धनाविषयी जागृती करण्यासाठी जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वयंसेवी संस्थांसह पर्यटन कंपन्याही विविध उपक्रम राबवितात. घटत्या संख्येमुळे सिंहांना धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत टाकले आहे. प्रामुख्याने शिकार, मनुष्याबरोबर संघर्षामुळे सिंहांच्या अस्तित्वावर गदा येत आहे.
Also Read: सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दहा प्रमुख पक्षांना दंड
सिंहाचे महत्त्व
भारतात सिंहाच्या आशियाई, बंगाली आदी प्रजाती आढळतात. जैवविविधता व पर्यावरण संतुलनासाठी सिंह महत्वाचा आहे. सिंहामुळे हरणासारख्या प्राण्यांची संख्या मर्यादित राहते. त्यामुळे, भारतात सिंहांच्या संवर्धनासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
आशियाई सिंहांची अभयारण्ये
गीर अभयारण्य (गुजरात)
Also Read: समांतर न्यायालय चालवू नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
प्रस्तावित
-
कुनो वन्यजीव अभयारण्य (मध्य प्रदेश)
-
सीतामाता अभयारण्य (राजस्थान)
-
चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य (उत्तर प्रदेश)
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना सिंहांच्या सुरक्षेसाठी काम करण्याची संधी मिळाली. एकीकडे सिंहांची संख्या वाढवण्यासाठी स्थानिकांबरोबर जागतिक समुदायाचीही मदत घेतली. तर दुसरीकडे पर्यटनालाही चालना दिली.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Esakal