पुणे – आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे
श्रीगुरू बालाजी तांबे लिखित ‘श्रीराम विश्वपंचायतन’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. शेजारी ज्येष्ठ नेते शरद पवार.गर्भसंस्कार पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी श्रीगुरू बालाजी तांबे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे.संतुलन आयुर्वेद’च्या मॉडर्न महाविद्यालय रस्त्यावरील ‘द आयुर्वेद स्टोअर’च्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ गायिका आशा भोसले, डॉ. अमोल कोल्हे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासमवेत संवाद साधताना श्रीगुरू बालाजी तांबे.‘सकाळ’च्यावतीने राबविण्यात आलेल्या बस डे उपक्रमात श्रीगुरू बालाजी तांबे यांचा प्रत्यक्ष सहभाग.श्रीगुरू बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेद उवाच’ या ग्रंथमालेतील पहिल्या दोन भागांचे प्रकाशन करताना ‘सकाळ’चे वाचक संभाजीराव पाटील, आशा शिंदे आणि अद्विती आचार्य. या वेळी (डावीकडून) सुरेशचंद्र पाध्ये, आचार्य, शिंदे, पाटील, श्रीगुरू बालाजी तांबे, वीणा तांबे, सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संजीव लाटकर.योगशास्त्राचे उद्गाते भगवान पतंजली यांची प्रतिमा भेट देऊन योगगुरू स्वामी रामदेव यांच्या सत्कारप्रसंगी श्रीगुरू बालाजी तांबे. सोबत पी. डी. पाटील.एका आध्यात्मिक कार्यक्रमात बोलताना श्रीगुरू बालाजी तांबे.