यवतमाळ : जिल्ह्यातील फुलसावंगी (fulsavangi yavatmal) येथील तरुणाचे हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न होते. त्यानुसार त्याने हेलिकॉप्टर बनविले. मात्र, रात्री हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना फॅन तुटला आणि पायलटच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती महागाव पोलिसांनी (mahagaon police) दिली.
Also Read: अल्पवयीनचा जबरदस्तीने गर्भपात; खुंटीवर पिशवीमध्ये ठेवले अर्भक

इस्माइल शेख, असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता. हळूहळू त्याचे स्वप्न साकार होत होते. तसेच तो आलमारी, कुलर असे विविध उपकरणे बनवायचा. तो फक्त ८ वा वर्ग शिकला होता. तरीही एक दिवस त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले. त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरू झाला. हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला आणि 2 वर्षांच्या प्रयत्नानंतर 15 ऑगस्टला त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. त्यासाठई 10 ऑगस्टच्या रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टर ची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर सुरू केलेले इंजिन 750 अम्पियरवर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र, अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि मुख्य फॅनला येऊन धडकला. तो फॅन इस्माइलच्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले. डोक्यावर फॅन लागल्याने इस्माइलचा मृत्यू झाला.
फुलसावंगी या गावाला जगामध्ये ओळख मिळवून द्यायची होती. १५ ऑगस्टला हेलिकॉप्टरचे लाँचिंग करणार होता. पण, फुलसावंगीच्या रँचोचा ट्रायल दरम्यान मृत्यू झाल्याने त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले.
Esakal