सध्या अप टू डेट राहण्यासाठी जो तो प्रयत्नशील असतो. त्यामुळे फॅशनच्या दुनियेत अपडेट सगळेजण राहत असतात. त्यात फॅशनचा सर्वात जास्त वापर तरुणी आणि स्त्रियांकडूनच होतो. घरकाम, शापिंग, किचनकाम, पार्टी या सर्वांसाठी फॅशन केलीच जाते. त्यात तरुणी आणि स्त्रियांना बाहेर फिरायला जायचे म्हटले की, हातात स्टाईलिश बॅग्स हे एकच पर्याय. सध्या स्टाईलिश बॅग्सचा बोलबाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय.

फ्लोरल प्रिंटेड क्लच पर्स: अशा पर्स तुमचा लुक पूर्ण करतील. लग्न-समारंभादरम्यान त्यांना हाताच्या बाजूला लटकवून तुम्ही स्वतःला आरामदायक ठेवू शकता.
पार्टी वियर क्लच पर्स: जर तुम्हाला अनोख्या स्टाईल हँडबॅग्स घ्यायच्या असतील तर या प्रकारची पर्स तुमच्यासाठी योग्य पर्याय असेल. पार्टी च्या वेळी हि पर्स एकदम सोबर दिसेल.
क्लच पर्स: एखाद्या लग्न समारंभावेळी तुम्ही असे क्लच कॅरी करू शकता. त्यामुळे तुमचा हटके लूक दिसेल.
ड्रास्ट्रिंग बॅग: ही स्टाईल नवीन नसली तरी आता कॉटन बॅग्सबाबत ती पुन्हा नवीन ट्रेंड होऊ पाहतीय. कॉलेजसाठी किंवा पिकनिकचे सामान त्यात सहज राहते आणि दोरीच्या सहाय्याने तिला छान लॉक ही करता येते.
पिरॅमिड बॅग: तुम्हाला नावावरूनच समजल असेल कि ही बग त्रिकोणी आहे. हि पिरॅमिड बॅग दिसायला आणि कॅरी करायला सुद्धा इजी पडते.
शॉपिंग बॅग: खास शॉपिंगसाठी डिझाईन केलेल्या या बॅग्स पाहताच बाजारहाट करायला निघावेसे वाटते. खोलगट सुबक आकारातली ही बॅग तुम्हालाही नक्कीच आवडेल.
मोंक बॅग: या बॅग ला झोला स्टाईल असे ही म्हणतात. ही मोंक बॅग सिम्पल आणि मस्त दिसते.
टिफिन बॅग: तुम्ही कॉलेज आणि ऑफिसला जात असाल तर टिफिन बॅगसाठी देखणी कापडी बॅग तुम्हाला वापरता येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here