ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्या खेळाडूने केली होती धडाकेबाज कामगिरी

Ind vs Eng Test: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत (Ind vs Eng 1st Test) इंग्लंडने दुसऱ्या डावात केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे सामन्यात रंगत आली होती. पण पावसामुळे (Rain Stopped Play) शेवटच्या दिवसाचा खेळ होऊच शकला नाही आणि सामना अनिर्णित (Match Drawn) राहिला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३०३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडने (England) २०९ धावांचे लक्ष्य भारताला दिले. चौथ्या दिवशी भारताने (Team India) ५२ धावा करत १ बळी गमावला पण शेवटच्या दिवशी पावसाने सामना होऊ दिला नाही. आता १२ ऑगस्टपासून दुसरी कसोटी सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का (Big Blow) बसला आहे.

Also Read: Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे…

भारतीय संघाला पहिल्या सामन्याआधी दोन धक्के बसले होते. शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल या दोघांना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. आता दुसऱ्या सामन्याआधी भारताच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार जो रूटला बाद करणारा भारताचा मराठमोळा गोलंदाज शार्दूल ठाकूर दुखापतग्रस्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शार्दूलला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली आहे. शार्दूल हा संघात वेगवान गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका बजावत होता. ऑस्ट्रेलियात दौऱ्यावरही त्याने आपली चमक दाखवली होती. पण शार्दूलच्या दुखापतीमुळे आता संघाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

Shardul-Thakur-Joe-Root-LBW

Also Read: Video: मराठमोळ्या शार्दूलने इंग्लंडच्या कर्णधाराला गुंडाळलं…

भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सराव करत असताना शार्दूलच्या स्नायूंवर ताण आला आणि तो जायबंदी झाला. वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर उपचार करत आहे. पण त्याच्या उपलब्धतेवर निर्णय उद्या सामना सुरू होण्याआधी घेण्यात येईल. शार्दूलच्या गैरहजेरीत आर अश्विन हा भारतासाठी चांगला पर्याय आहे पण वेगवान गोलंदाजीचा एक पर्याय कमी होत असल्याने विराट आणि कंपनी नक्की काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Stuart Broad and James Anderson

इंग्लंडचा अनुभवी वेगवान स्विंग गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा दुसऱ्या कसोटीला मुकण्याची दाट शक्यता आहे. ब्रॉडच्या उडव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापतीमुळे त्याला धावताना अडचण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्याला विश्रांती दिली जाईल असे सांगितले जात आहे. मात्र त्याबद्दल अद्याप अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here