अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात ही चहाने करतात. चहा हे अनेकांचे आवडते पेय आहे. तुम्ही जर चहा प्रेमी असाल तर आरोग्यासाठी गुणकारी असणारे हे चहाचे प्रकार नक्की ट्राय करा!

मसाला चहा हा अनेकांचा आवडता चहाचा प्रकार आहे. हा चहा दालचिनी, लवंगा, वेलची हे मसाल्यांचा वापर करून केला जातो. हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तसेच या चहाने पचन क्रिया देखील चांगली होते. जर हा चहा तुम्ही रोज एक कप पिला तर तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढेल.
दार्जिलिंग चहाचे व्हाइट, ब्लॅक आणि ओलॉन्ग हे तिन प्रकार आहेत. हे सर्व प्रकार गॅस्ट्रिक अल्सर आणि लठ्ठपणा टाळण्यास मदत करतात.
इराणी चहा हा देखील आरोग्यासाठी गुणकारी आहे. हा चहाचा प्रकार भारतातील पुणे आणि हैद्राबाद या शहरामध्ये जास्त लोकप्रिय आहे. या चहामध्ये मावा किंवा खोया टाकला जातो. इराणी चहा हा ह्रदयासाठी अत्यंत चांगला आहे.
बटर टि हा ‘गुर गुर चहा’ म्हणून देखील ओळखला जातो. हा चहा सिक्कीम आणि लडाखमध्ये जास्त लोकप्रिय आहे. हा गवती चहा, याक मिल्क बटर, पाणी आणि मिठ या पासून तयार केला जातो. बटर टि हा हृदयासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठी पिला जातो.
निलगिरी चहा हा ‘ब्लू माउंटन टी’ म्हणून देखील ओळखला जातो. हा चहा वजन घटवण्यासाठी आणि डायबिटीज कमी करण्यासाठी गुणकारी आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here