बॉलीवूडमध्येही सेलिब्रेटी त्यांच्या लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसतात. मात्र साऊथमधील अनेक सेलिब्रेटींची लग्न ही कायम चर्चेत राहिली आहे. त्याचे कारण म्हणजे त्या लग्नांमध्ये सेलिब्रेटींनी केलेला खर्च. आता आपण अशा टॉलीवूडमधील सेलिब्रेटींची लग्नं पाहणार आहोत की त्यात त्यांनी केलेला खर्च हा नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांनी त्या लग्नामध्ये पाण्यासारखा खर्च केला आहे. मुळातच साऊथमध्ये चित्रपट आणि त्यातील कलाकार यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याचे दिसून आले आहे. तिथे कलाकारांना देवाचा दर्जा दिल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहे. त्यामुळे ज्यावेळी आपल्या आवडीच्या एखाद्या सेलिब्रेटीचं लग्न असते तेव्हा चाहतेही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे पाहवयास मिळाले आहे.

अभिनेता सुर्यानं ज्योतिकाशी लग्न केलं. हे एक साऊथमधील मोठं लग्न सांगता येईल. त्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या लग्नामध्ये कमल हसन, धनुष आणि ऐश्वर्या राय सहित अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

साउथमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजनं आपली लहानपणीची मैत्रीण उपासना कामिनेनी हिच्याशी लग्न केलं होतं. त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अभिनेता अमिताभ बच्चन, श्रीदेवी, बोनी कपूर यांच्यासहित बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते.

नंदमुरी तारक रामा राव उर्फ एनटीआर ज्युनिअरनं लक्ष्मी राव हिच्याशी लग्न केलं होतं. लक्ष्मी राव ही उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी. त्या दोघांचे लग्न मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात पार पडले. लग्नामध्ये लक्ष्मीनं जी साडी घातली होती त्याची किंमतच एक कोटी रुपये एवढी होती. तर मंडपाचा खर्चच 18 कोटी रुपये एवढा होता. त्या लग्नाचा खर्च 100 कोटींच्या घरात गेला होता.

साऊथमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणून अल्लु अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांचं नाव घेता येईल. माधापूर मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. त्यालाही देशभरातील वेगवेगळे दिग्गज उपस्थित होते. हे लग्न कव्हर करण्यासाठी 40 फोटोग्राफर होते. त्यावरुन त्या लग्नाची भव्यता लक्षात येईल. त्या लग्नाविषयी वेडिंग फोटोग्राफर जोसेफ राधिकनं सांगितलं, ते लग्न कव्हर करायला 40 फोटोग्राफर होते.

जनार्धन रेड्डी यांनी 2016 मध्ये आपल्या मुलीचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रातील सर्वाधिक खर्चिक लग्न होतं. त्या लग्नातील विधी हे पाच दिवस चालले होते. यावरुन ते लग्न किती मोठं असेल यांची कल्पना येते. त्या लग्नामध्ये 50 हजार व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. लग्नाचा एकुण खर्च 550 कोटी रुपये एवढा होता.
Esakal