नागपूर : पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) ही एक गंभीर समस्या आहे. पक्षाघात अचानक होत नाही तर साधारण दहा वर्षं आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विस्मरण होणे, दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेत घट होणे ही भविष्यात पक्षाघाताचा झटका येण्याची काही लक्षणे आहेत. जवळपास २८ वर्ष संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जीवनशैलीत काही बदल करून हा धोका कमी करू शकता.

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आल्यानंतर पक्षाघात होण्याची शक्यता असते.
उच्च रक्तदाबामुळे पक्षाघात होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. म्हणून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
आहारात मिठाचे प्रमाण कमी करा.
ज्येष्ठांना पक्षाघाताचा धोका अधिक असल्यामुळे त्यांनी जीवनशैली बदलायला हवी.
कोलेस्टरॉलचे अधिक प्रमाण, हृदयविकार तसेच मधुमेहाच्या रुग्णांना पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
नियमित व्यायाम, वेळेत औषधोपचार आणि आहारात योग्य ते बदल करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here