विकास खन्ना vikas khanna हा त्याच्या पाककौशल्यासाठी cooking style प्रसिद्ध आहे. त्याच्या आयुष्यावरही आता एक चित्रपट येतो आहे. त्याचं आयुष्य हे एखाद्या चित्रपटासारखं आहे हे ख्यातनाम दिग्दर्शक आंद्रेई सेवर्नीला वाटलं आणि त्यानं त्याच्या आयुष्यावर चित्रपट करण्याचा विचार केला. त्याच्यावरील चित्रपटाच्या शुटिंगचं काम पूर्ण झालं असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहे. विकासच्या चाहत्यांनाही त्याच्या आयुष्य़ावरील चित्रपटाचे वेध लागले आहेत. बेरीड सीड्स buried seeds नावानं हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यानं म्हणजे 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आंद्रेई सेवर्नीनं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, विकास खन्नाला त्याच्या लहानपणापासून फार संघर्ष करावा लागला. लहान असताना त्याला नीट चालताही येत नव्हते. त्याच्या पायाला एक गंभीर आजार झाला होता. त्याच्या जीवघेण्या त्रासातून त्याला जावं लागलं. अशा प्रसंगावर मात करत त्यानं स्वताची एक वाट तयार केली. आणि आजच्या घडीला तो प्रख्यात शेफ झाला आहे.

Also Read: अख्ख्या विमानात एकटाचं: भुत बंगल्यासारखं वाटलं, आर माधवनचा अनुभव

चित्रपट बेरीड सीड्समध्ये त्याच्या कुकिंग स्टाईल, आवड याविषयी मांडणी करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यात त्याच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या प्रसंगाची पेरणीही त्यात करण्यात आली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा यालाही स्थान देण्यात आले आहे. भारतीय खाद्य संस्कृती, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये यांना विचारात घेण्यात आले आहे. विकासनं एक स्वप्न उराशी बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यानं घेतलेले कष्ट यावर चित्रपट भाष्य करतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here