शिरोळ (कोल्हापूर) : बैलगाडीच्या शर्यती २०११ पासून बंद आहेत. जंगली प्राणी म्हणून जे, बैलाचे वर्गीकरण केले आहे, ते मुक्त करावे, बैलगाडीच्या शर्यती सुरू कराव्यात, या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र रेसिंग असोसिएशनतर्फे तहसील कार्यालयावर बैलगाडी धारकांनी मोर्चा काढला. अनेक गावातील जत्रेत बैलगाड्यांच्या शर्यती होत्या. या शर्यतीत धावणारे बैलांची किंमत एक ते पाच लाखांपर्यंत आहे. या बैलांना मुलाप्रमाणे खुराक दिला जातो. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची उपजीविका, शर्यतीच्या बैलाच्या संगोपनातून होते.
हातकणंगले तालुका बैलगाडी चालक-मालक संघटनेतर्फे हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढला.
शहरातील काही बुद्धिजीवी लोकांनी, बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यांत करून, बैलगाडी शर्यती बंद पडल्या आहेत. शासनाने या शर्यती पुन्हा सुरू कराव्यात, या मागणीसाठी गडहिंग्लज , हातकणंगले तालुक्यात आज बैलगाडीसह मोर्चाचे नियोजन केले खरे. पण, पोलिस प्रशासनाने कोरोनाचे कारण पुढे करत मोर्चा न काढण्याची विनंती केली. त्याला मान देत अखेर मोर्चा थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, शर्यतींच्या परवानगीसाठी लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकरी व रेस शौकिनांनी केला. बैल पळविणे या खेळास शर्यत ही उपाधी देऊन त्यावरील बंदी उठवावी, या मागणीसाठी हातकणंगले तालुका बैलगाडी चालक-मालक संघटनेतर्फे हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढला. याची काही छायाचित्रे..





Esakal