Nag Panchami 2021: भारतीय परंपरेत सण समारंभ आणि लग्न सोहळ्यात मेहंदी काढण्याची पद्धत आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व मुली आणि महिलांना मेहंदी काढायला खूप आवडते. मुलींचा आणि महिलांचा सण म्हणजे नागपंचमी. या सणासाठी बाजारात खरेदी करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु झाली आहे. सोंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, कपडे या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातीलच एक महत्वाचं म्हणजे मेहंदी. मेहंदी शिवाय नागपंचमीचा सण हा दिवस अपूर्ण आहे. सध्या मेहंदी मध्ये अनेक निरनिराळ्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत. काहींना सिम्पल डिझाईन्स आवडते तर काहींना हात भरून मेहंदी डिझाईन्स काढायला आवडते. चला तर मग मेहंदीच्या निरनिराळ्या डिझाईन्स पाहुयात.

मेहंदी म्हणजे स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारी गोष्ट
मेहंदी अशी जी स्त्रियांच्या हाताची शोभा वाढवते
नागपंचमीचा सण असल्यामुळे बाजारपेठेतही खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे.
हातावर रंगलेली मनमोहक मेहंदीची डिझाईन तिच्या या आनंदात अधिक भर घालते.
मेहंदीच्या निरनिराळ्या डिझाईन्स मध्ये देखील जीवनातल्या अनेक गोष्टीचे संकेत लपलेले असतात.
कोणताही सण- समारंभ वा कार्यक्रम असो त्यांच्या नटण्यामध्ये मेहंदीचा आवर्जून समावेश असतो.
मेहंदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.
सध्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मेहंदीची थीम आल्यामुळे मेहंदी जितकी चांगली काढता येईल तितकी ती सुंदर काढली जात आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here