राज्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनाला अर्थात ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२१’ या प्रदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

पुणे – राज्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनाला अर्थात ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२१’ या प्रदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरत असल्याचे विद्यार्थी-पालकांनीही नमूद केले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा गुरुवारी (ता. १२) शेवटचा दिवस आहे. प्रदर्शनात विविध शैक्षणिक संस्थांची माहिती देणारे स्टॉल, व्याख्याने याला अनेकांनी ऑनलाइनद्वारे हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित केलेल्या या शैक्षणिक प्रदर्शनाचे ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ हे मुख्य प्रायोजक आहेत. या शैक्षणिक प्रदर्शनासाठी ‘www.sakalexpo.com’ संकेतस्थळावर मोफत लॉगिन केल्यानंतर विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातील विविध स्टॉल, वेबिनार, हेल्प डेस्क येथे ऑनलाइनद्वारे भेट देणे अगदी सहज शक्य होत आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधील विविध अभ्यासक्रम, त्याचे वेगळेपण याबाबत प्रदर्शनातील स्टॉल‌मध्ये माहिती मिळत आहे, तसेच करिअरविषयक मार्गदर्शनासाठी असणाऱ्या ऑनलाइन व्याख्यानातही अनेकांनी उपस्थिती लावली. हेल्प डेस्क, लाइव्ह चॅटद्वारे विद्यार्थी-पालकांनी त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ, समुपदेशक, अभ्यासक यांच्याकडून जाणून घेतली.

Also Read: UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर, पाहा डिटेल्स

प्रदर्शनात सहभागी झालेल्या शैक्षणिक संस्था

प्रदर्शनात देशातील २५ नामांकित विद्यापीठांसमवेत शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. यात ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, एमआयटी-एडीटीयू, एनएमआयएमएस ग्लोबल, अमृता विश्व विद्यापीठम्‌, टेक महेंद्रा फाउंडेशन, कन्व्हे डॉट इन, एआयएसएसएमएस, शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, आर्मस्‌ ॲकॅडमी, डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चरल अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, ॲस्ट्युट ॲकॅडमी, अनीस डिफेन्स, संजय घोडावत युनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here