वेंगुर्ले – तुळस गिऱ्याचे गाळव ते रेवटीवाडी परिसरात गवारेड्याची तब्बल चार गोळ्या घालून हत्या केल्याची घटना काल (ता.24) उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा – ती त्यांच्यासमोर आली आणि गळयावर वार करून गेली…
तुळस गिऱ्याचे गाळव ते रेवटीवाडी परिसरात काल (ता.24) गवारेडा मृतावस्थेत आढळला. या घटनेची खबर येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी मठ वनपाल चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल वदवी यांनी गवारेड्याचे विच्छेदन केले असता त्याची चार गोळ्या घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली. काही वर्षांपासून सुमारे 8 ते 9 गवारेड्यांचा कळप वाघेरी जंगलात वास्तव्यास आहे. हा कळप मोठ्या प्रमाणात भातशेती व बागायतीची हानी करत होता. या गवारेड्याच्या हत्येमागील गूढ वाढले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हे पण वाचा – शब्बास मर्दा…. तो थेट दवाखान्यातून अॅम्बुलन्समध्ये बसून गेला परीक्षा केंद्रावर….

News Story Feeds