उंब्रज (सातारा) : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील (Karad North Assembly constituency) सातारा जिल्हा परिषदेचा उंब्रज गट हा राजकीयदृष्ट्या महत्त्‍वाचा मानला जातो. पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्या नेतृत्वाखाली गेली १५ वर्षे या गटावर राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेली १५ वर्षे काँग्रेस (Congress), भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) यांनी राष्ट्रवादीविरुध्द दंड थोपटले. परंतु, त्यांना हा गड जिंकता आला नाही. गटात आत्तापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीत नेहमी चुरस पाहावयास मिळत होती. परंतु, मागील काही वर्षांत काँग्रेसला मागे टाकत भाजपने मुसंडी मारत आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली १५ वर्षे या गटावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

गत निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली होती. यामुळे दोन्ही गटांतील नाराज उमेदवारांनी बंडखोरी केल्याने याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारास झाला. गटात, गणांत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक कामे केली आहेत. त्यात ग्रामीण भागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. गटातील विद्यमान सदस्या विनिता पलंगे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला असून, येत्या काळात ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना संकटामुळे तसेच प्रशासकीय दिरंगाईमुळे दोन वर्षांपासून निधीची कमतरता असल्याने काही कामे खोळंबलेली आहेत. तर गटातील ग्रामीण भागात ठोस कामे होणे गरजेचे आहे. उंब्रज गावची वास्तव लोकसंख्या जास्त व कागदोपत्री लोकसंख्या कमी हा फरक असल्याने येणारा निधी विकासकामांसाठी कमी पडत आहे. सध्या पालकमंत्री पाटील यांनी उंब्रज गावच्या विकासासाठी २२ कोटी रुपयांची पेयजल योजना व ६० लाख रुपये पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी अशा अनेक योजना मार्गी लाऊन कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Also Read: दूध उत्पादकांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढणार : मंत्री केदार

Karad North Assembly constituency

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरी सुविधा, जनसुविधा, “क” वर्ग, सेस फंड, समाजकल्याण, १५ वा वित्त आयोग यातून चार कोटी २४ लाखांची कामे मार्गी लावली आहेत. तसेच उंब्रज जिल्हा परिषद शाळेसाठी जिल्हा परिषदेमार्फत आजपर्यंत सहा खोल्या मंजूर करून पूर्ण केल्या आहेत. तर या वर्षात २८.२८ लाखांच्या चार खोल्या लवकरच मंजूर होतील.

-विनिता पलंगे, सदस्या, उंब्रज गट

गटातील विद्यमान सदस्या विनिता पलंगे यांनी जिल्हा परिषद माध्यमातून प्रत्येक गावास मागणीनुसार निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राजकारण बाजूला ठेवत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या प्रयत्न केला आहे. वैयक्तिक योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचवल्या आहेत.

-विनोद ऊर्फ सोमनाथ जाधव, माजी पंचायत समिती सदस्य, उंब्रज

Also Read: शिंदे दाम्पत्याने पालिकेची अब्रू आणली चव्हाट्यावर

रस्ते, नाले, सभामंडप, पाणीपुरवठा या मूलभूत कामांसाठी सरकारने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या साहाय्याने ग्रामपंचायती काम करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या कामांव्यातरिक्त ठोस व मूलभूत कामे करण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली कामे व करता येण्यासारखी कामांची तुलना जनतेतून केल्यास ठोस कामे होणे गरजेचे आहे.

-सुनील पाटील, तालुकाध्यक्ष, शिवसेना-कऱ्हाड उत्तर

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here