भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यावेळी 22 ऑगस्ट रोजी आहे. विशेष बाब म्हणजे या वेळी रक्षाबंधन रविवार असल्याने बहुतांश लोकांना ऑफीसला जाण्याचे टेन्शन राहणार नाही. त्यामुळे अनेकांनी स्वतःचे काही प्लॅन बनवले असावेत. तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बहिणीसाठी गिफ्ट्स निवडले आहे का? जर तुम्ही अजूनही विचार करत असाल तर या वस्तू तुम्हाला नक्की आवडतील.

मुलींना पारंपरिक कपड्यांवर मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात. अनेकींकडे निरनिराळ्या रंगाच्या आणि पॅर्टर्न्सच्या बांगड्या असतात. तुमच्या बहिणीलादेखील अशी आवड असेल. तर तिच्या बांगड्यांच्या कलेक्शनसाठी हे गिफ्ट नक्की घ्या.

जर तुमच्या बहिणीला लिखाणाची आवड असेल तर तिला नोटबुक भेट देऊ शकता.

जर तुमच्या बहिणीला कॉफी पिण्याची आवड असेल तर तिला हे कॉफी मग देखील तुम्ही भेट देऊ शकता.

तुमच्या बहिणीला भटकंतीची आवड असेल तर हे अगदी मस्त गिफ्ट आहे. सतत नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड असेल तर तिला हे गिफ्ट नक्कीच द्या.

जरी आता पावसाळा असला तरी सनग्लासेस किंवा गॉगल नेहमीच फॅशन म्हणून वापरता येतात. त्यामुळे जर तुमची बहिण थोडी ट्रेन्डी आणि चुलबुली असेल तर तिला सनग्लासेस गिफ्ट द्या.

म्युझिक हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तुमची बहिण देखील म्युझिकप्रेमी असेल तर इअर फोन गिफ्ट म्हणून तिला नक्कीच आवडेल.

आजकाल मार्केटमध्ये खास राखीपौर्णिमेसाठी काही गिफ्टस् तयार केले जातात. जे तुम्हाला नक्कीच आवडू शकतील.

तुमची बहिण नोकरी करणारी असेल तर तिच्यासाठी हे गिफ्ट नक्कीच उपयोगाचं ठरेल.

मुलींना मेकअप आणि त्या रिलेटेड गोष्टी नेहमीच आवडतात. जर तुमच्या बहिणीलादेखील मेकअपची आवड असेल तर तिला मेकअप ब्रशचं हे किट गिफ्ट करा.

साडी ही प्रत्येक स्त्रीसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे जर तुमची बहिण मोठी असेल अथवा विवाहित असेल तर तिला यंदा साडी नक्कीच द्या.

प्रत्येक स्त्रीसाठी तिचे केस खूप खास असतात. काळेभोर आणि घनदाट केस असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. मग यासाठी प्रत्येक महिला चांगला शाम्पू, कंडिशनर आणि हेअर सिरमच्या शोधात असते.

ड्रेसेस ही भेट फिमेलची ऑल टाइम फेवरेट आहे. तिचा वॉर्डरोब जुन्यापासून नवीन डिझाईनच्या कपड्यांपर्यंत कितीही भरलेला असला तरी तीला नेहमी ड्रेसेसची कमी जाणवते. ही एक अशी भेट आहे जी कोणत्याही वयाच्या बहिणीसाठी सहज खरेदी केली जाऊ शकते.

तुमची बहीण, कोणत्याही वयोगटातील असो, त्यांनी कधी ना कधी कॉस्मेटिकचा वापर केलाच पाहिजे. तुम्ही त्यांच्यासाठी कॉस्मेटिक खरेदी करू शकता.

दागिन्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही, मग ती सोने असो किंवा आर्टिफिशियल. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी भेट म्हणून ज्वेलरी निवडू शकता.

मोठ्या डायल घड्याळाची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहे. रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला भेट देण्यासाठी घड्याळ निवडू शकता.

आजकाल बटुआ ची फॅशनही खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एक बटुआ देखील खरेदी करू शकता.

रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी हँड बॅग क्लच हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण काहीही असो, महिला आणि तरुणींना हँड बॅग क्लच हातात पकडण्याची आवड असते.
Esakal