बहुतांश गिर्यारोहकांना तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या हौशी खेळाडूंना खुणावणारा कळसुबाई हा ट्रेक आहे.
बोदवड : जळगाव येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात चौथीमध्ये शिकणारा अवघ्या नऊ वर्षे वयाच्या श्रीमद् प्रशांत बडगुजर याने सोमवारी (ता. ९) महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसुबाई शिखर (Kalsubai mountain) सर केले अन् भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा (Indian Flag) फडकविला.
Also Read: बीएचआर घोटाळा: सुनील झंवरच्या कोठडीसाठी १० मुद्यांचा आधार
श्रीमद् हा लहान वयातच जळगाव रनर्स ग्रुपचा सदस्य बनला. त्याचे वडील डॉ. प्रशांत बडगुजर यांच्या मार्गदर्शनात रनिंग आणि ॲथलेटिक्सचा सराव हा श्रीमदला कळसुबाई शिखर गाठताना अत्यंत उपयोगी ठरला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतारांगातील कळसुबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर म्हणजेच ५३४९.५ फूट उंच आहे. बहुतांश गिर्यारोहकांना तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या हौशी खेळाडूंना खुणावणारा हा ट्रेक आहे. शिखराच्या पायथ्याशी बारी नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून शिखरावर जाण्यासाठी पारंपरिक मार्ग आहे तर दुसऱ्या बाजूने जहागीरदारवाडी नावाचे गाव आहे. तेथून तुलनेने खडतर असा मार्ग शिखराकडे जातो. गिर्यारोहकांची क्षमता, धाडस बघणारा मार्ग श्रीमद् व त्याच्यासोबत असलेल्या गिर्यारोहकांनी निवडीला. श्रीमद् सोबत त्याचे वडील प्रशिक्षित गिर्यारोहक डॉ. प्रशांत बडगुजर आणि सिंगापूर येथे कार्यरत असलेले आयआयटी इंजिनिअर भारत राजपूत यांनी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गिर्यारोहणाला सुरुवात केली. अवघड वाटा, काटेरी मार्ग, रस्त्यात आढळलेले साप व इतर वन्यप्राणी, नयनरम्य निसर्ग यांच्या सान्निध्यात श्रीमद् आणि टीमने दुपारी सव्वाबाराला ही मजल मारली.

श्रीमदच्या या यशाबद्दल त्याची आई डॉ. श्रेया बडगुजर, आजी-आजोबा, इतर नातेवाईक, वर्गशिक्षिका, जळगाव रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले आहे. केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष भागवत राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ. अजय पाटील, जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख ईश्वर महाजन, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील श्रीमदचे अभिनंदन केले.
Also Read: ‘न्हाई’ने २७ दिवसांत उभारला ऑक्सिजननिर्मिती प्लांट
सर्वांत लहान गिर्यारोहक
कळसुबाई शिखर सर करणारा जळगाव जिल्ह्यातील तसेच बोदवड तालुक्यातील सर्वांत लहान वयाचा गिर्यारोहक म्हणून श्रीमदने नावलौकिक केले आहे. ज्या लहान वयात मुलांना मोबाईलचे वेड असते. त्या वयात श्रीमद् रनिंग, अॅथलेटिक्स आणि गिर्यारोहण हे छंद जोपासत आहे.
Esakal