पवार कुटुंबातील अशाच एका सोहळ्याचे फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत.
पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुटुंब मोठा आहे. सण किंवा कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब जेव्हा एकत्र येतात, तेव्हा नेहमीच त्यांच्यात जल्लोष पाहायला मिळतो. यांच्याच कुटुंबातील श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांचा विवाह बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. पवार कुटुंबातील अशाच एका सोहळ्याचे फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत. सुप्रिया सुळे यांची भाची म्हणजेच चुलत बंधू श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांच्या शाही विवाहसोहळ्याचे हे फोटो आहेत.


नववधू मिथिला पवार आणि करण विरवाणी










Esakal