देवगड (सिंधुदुर्ग) : “हापूस’च्या नावाखाली अन्य राज्यातील आंबा विक्रीस प्रतिबंध करण्याबरोबरच येथील हापूस विक्रीसाठी आता “जी.आय. मानांकन’ अनिवार्य आहे. प्रमाणपत्र नसल्यास संबधितावर कारवाई प्रस्तावित होऊ शकते. यासाठी हापूस आंबा उत्पादक, शेतकरी, विक्रेते, अडते, पुरवठादार, निर्यातदार, किरकोळ विक्रेते, पॅकींग साहित्य उत्पादक, प्रक्रीया उद्योजक आणि रोपवाटिकाधारक (नर्सरी) यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आणि सहकार्य संस्थेकडून करण्यात येणार आहे.
“हापूस’ कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेले पीक आहे. याची विक्री करताना जी.आय. नोंदणी सर्टिफिकेशन (भौगोलिक निर्देशन) असणे आवश्यक आहे. हापूस आंब्याशी संबधित सर्वच व्यवसायिकांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. कर्नाटक किंवा अन्य राज्यातील आंबा “देवगड किंवा रत्नागिरी’ हापूसच्या नावाखाली विक्री करता येऊ नये यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यातील सर्व आंबा शेतकरी आणि संबधित व्यवसायिकांना प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा- कँटिनला लागली आग आणि बघता बघता…
‘जीआय’ नसल्यास कारवाईची शक्यता
तरच अनधिकृत होणाऱ्या हापूस आंबा विक्रीस अटकाव करता येईल. यासाठीची नोंदणी प्रक्रीया संस्थेच्या जामसंडे येथील कार्यालयात सुरू आहे. यंदापासून प्रमाणपत्र न घेता हापूस आंबा म्हणून विक्री करणाऱ्या अथवा हापूस आंबा संबधित उत्पादने “हापूस’ नावाखाली विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर जी.आय. सेक्रेटरीएटमार्फत कडक कारवाई होऊ शकते. यासाठी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा- महाविकास आघाडी विरोधात सिंधुदुर्गवासी एकवटले…
आतापर्यंत 250 नोंदणी
आतापर्यंत सुमारे 250 शेतकरी, व्यावसायिकांनी आपली नोंदणी केली असून त्यापैकी बऱ्याच जणांना प्रमाणपत्र आणि जी.आय. नोंदणी क्रमांकही प्राप्त झाले आहेत.

News Story Feeds