वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : एटीएम म्हटले की चांगल्या आणि नव्या नोटा अशी आशा अनेक वेळा असते. मात्र वेंगुर्ला तालुक्यात अनेक एटीएममध्ये ग्राहक पैसे काढण्यास गेले असता चक्क फाटक्या नोटा आणि त्याही दोन हजार रुपयांच्या बाहेर येतात. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसत आहे . एका बाजूस फाटक्या नोटा मिळाल्यानंतर दुसऱ्या बाजूस त्या बँका स्वीकारण्यास तयार होत नसल्यामुळे ग्राहकांना अनेक वेळा मोठा मानसिक ताप सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील बँकांच्या काही एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या जुन्या मळक्या, खराब झालेल्या नोटा ठेवल्या जातात. वेंगुर्ले तालुक्यातील काही एटीएममध्ये प्लॅस्टिक पट्टी लावलेल्या व डाग असलेल्या नोटा ग्राहकांना एटीएममधून येत असतात. त्या एटीएमच्या बँकेत गेल्यावर या नोटा आमच्या नाहीत, असे सांगून हात वर केले जातात. परिणामी खातेदारांना या नोटा बदलण्यासाठी स्टेट बँकेत जावून या नोटा बदलून घ्याव्या लागतात. याचा मनस्ताप ग्राहकांना होतो.
हेही वाचा- आता हापूस ओळखणे झाले सोपे …कसे ते वाचा..
नोटा फाटक्या आणि जीर्ण अवस्थेत
अनेक वेळा ग्राहक तातडीने रक्कम मिळावी यासाठी एटीएम मधून पैसे काढतात. मोठी रक्कम काढल्यानंतर बहुतांश वेळा एटीएम मधून 2000 रुपयाच्या नोटा बाहेर येतात. मात्र त्याही फाटक्या आणि जीर्ण अवस्थेत असतात आणि अशा नोटा अनेक ठिकाणी नाकारण्यात येते. त्यामुळे ही रक्कम गरजे वेळी हातात येतच नाही.
हेही वाचा- कँटिनला लागली आग आणि बघता बघता…
पैसे भरताना चांगल्या नोटा भरा
बँकांनी एटीएममध्ये पैसे भरताना चांगल्या नोटा भराव्यात. नोटा सुस्थितित असल्याची खात्री करूनच नोटा भरल्यास ग्राहकांना होणारा मनस्ताप वाचेल, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद सदस्य जयराम राऊळ यांनी केले आहे.

News Story Feeds