चिपळूण (रत्नागिरी) : भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला जवान विशाल रघुनाथ कडव यांची कामगिरी दैदिप्यपान अशीच राहिली आहे. आर्मीत 2008 ला पहिल्याच प्रयत्नात भरती झालेल्या विशाल यांनी किकबॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले. कमांडोचे प्रशिक्षण घेत घातक टीममध्ये यशस्वी कामगिरी केली. नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) मध्ये त्यांची निवड झाली होती. येत्या काही दिवसांत ते दिल्लीच्या एनएसजी टीममध्ये सहभागी होणार होते. त्यापूर्वीच मध्यप्रदेश येथील सागर शहरात अपघातात झालेली त्यांची एक्‍झिट, सर्वांच्या मनाला चटका लावणारी अशीच ठरली आहे.

तालुक्‍यातील पिंपळी खुर्द येथील विशाल रघुनाथ कडव यांची 2008 मध्ये आर्मीत भरती झाली होती. सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले. शालेय जीवनात त्यांनी धावणे प्रकारात नेहमीच पहिला क्रमांक पटकावला. 2008 ते 2011 या दरम्यान त्यांनी कानपूर येथे सेवा केली. त्यानंतर जम्मू काश्‍मिरमधील विविध भागासह गुजरातमध्ये त्यांनी सेवा केली. काही वर्षापूर्वी त्यांनी बेळगाव येथे कमांडो प्रशिक्षण घेतले होते. सैन्य दलातही त्यांनी बॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले होते.

हेही वाचा- कँटिनला लागली आग आणि बघता बघता…

किकबॉक्‍सिंगमध्ये उमटवला होता ठसा

कमांडोचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घातक टीममध्येही काम केले होते. पुछ, जम्मू आदी विविध ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी अतिरेक्‍यांवर कारवाई केली होती. त्यांचे वडीलही माजी सैनिक आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. एक मुलगा आणि पत्नीला त्यांनी मध्यप्रदेशला नेले होते. काही दिवसांपूर्वीच गावी येवून त्यांनी वडिलांची भेट घेतली होती.

हेही वाचा- महाविकास आघाडी विरोधात सिंधुदुर्गवासी एकवटले…

धाडसी कामगिरी आम्हाला भावली

विशाल कडव यांची टीममधील कामगिरी सुरेख अशीच ठरली आहे. किकबॉक्‍सिंगमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांची धाडसी कामगिरी आम्हाला भावली होती. त्यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःख आहे.
विकास खरात, 15 मराठा बटालियन टीममधील सहकारी.

हेही वाचा- आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचा जनआक्रोश…

सर्वस्व पणाला लावले

सीमेवर दहशतवादी व अतिरेक्‍यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. सध्या ते 15 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांची राखीव असलेल्या नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) दिल्ली टीममध्ये निवड झाली होती. पुढील काही महिन्यात ते दिल्लीत दाखल होणार होते.

News Item ID:
599-news_story-1582638593
Mobile Device Headline:
'या जवानाची' दिल्लीच्या एनएसजी टीममध्ये सहभागापूर्वीच जिवनातून एक्‍झिट ….
Appearance Status Tags:
vishal kadav accident kokan marathi newsvishal kadav accident kokan marathi news
Mobile Body:

चिपळूण (रत्नागिरी) : भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला जवान विशाल रघुनाथ कडव यांची कामगिरी दैदिप्यपान अशीच राहिली आहे. आर्मीत 2008 ला पहिल्याच प्रयत्नात भरती झालेल्या विशाल यांनी किकबॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले. कमांडोचे प्रशिक्षण घेत घातक टीममध्ये यशस्वी कामगिरी केली. नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) मध्ये त्यांची निवड झाली होती. येत्या काही दिवसांत ते दिल्लीच्या एनएसजी टीममध्ये सहभागी होणार होते. त्यापूर्वीच मध्यप्रदेश येथील सागर शहरात अपघातात झालेली त्यांची एक्‍झिट, सर्वांच्या मनाला चटका लावणारी अशीच ठरली आहे.

तालुक्‍यातील पिंपळी खुर्द येथील विशाल रघुनाथ कडव यांची 2008 मध्ये आर्मीत भरती झाली होती. सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले. शालेय जीवनात त्यांनी धावणे प्रकारात नेहमीच पहिला क्रमांक पटकावला. 2008 ते 2011 या दरम्यान त्यांनी कानपूर येथे सेवा केली. त्यानंतर जम्मू काश्‍मिरमधील विविध भागासह गुजरातमध्ये त्यांनी सेवा केली. काही वर्षापूर्वी त्यांनी बेळगाव येथे कमांडो प्रशिक्षण घेतले होते. सैन्य दलातही त्यांनी बॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले होते.

हेही वाचा- कँटिनला लागली आग आणि बघता बघता…

किकबॉक्‍सिंगमध्ये उमटवला होता ठसा

कमांडोचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घातक टीममध्येही काम केले होते. पुछ, जम्मू आदी विविध ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी अतिरेक्‍यांवर कारवाई केली होती. त्यांचे वडीलही माजी सैनिक आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. एक मुलगा आणि पत्नीला त्यांनी मध्यप्रदेशला नेले होते. काही दिवसांपूर्वीच गावी येवून त्यांनी वडिलांची भेट घेतली होती.

हेही वाचा- महाविकास आघाडी विरोधात सिंधुदुर्गवासी एकवटले…

धाडसी कामगिरी आम्हाला भावली

विशाल कडव यांची टीममधील कामगिरी सुरेख अशीच ठरली आहे. किकबॉक्‍सिंगमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांची धाडसी कामगिरी आम्हाला भावली होती. त्यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःख आहे.
विकास खरात, 15 मराठा बटालियन टीममधील सहकारी.

हेही वाचा- आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचा जनआक्रोश…

सर्वस्व पणाला लावले

सीमेवर दहशतवादी व अतिरेक्‍यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. सध्या ते 15 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांची राखीव असलेल्या नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) दिल्ली टीममध्ये निवड झाली होती. पुढील काही महिन्यात ते दिल्लीत दाखल होणार होते.

Vertical Image:
English Headline:
commando vishal kadav accident kokan marathi news
Author Type:
External Author
नागेश पाटील
Search Functional Tags:
भारत, चिपळूण, प्रशिक्षण, Training, शिक्षण, Education, दिल्ली, अपघात, वन, forest, कानपूर, जम्मू, वर्षा, Varsha, बेळगाव, आग, सैनिक, पत्नी, wife, विकास, दहशतवाद
Twitter Publish:
Meta Keyword:
kokan commando vishal kadav news
Meta Description:
commando vishal kadav accident kokan marathi news
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला जवान विशाल रघुनाथ कडव यांची कामगिरी दैदिप्यपान अशीच राहिली आहे.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here