दीपिका पादुकोण – स्टार अभिनेत्री दीपिकाचं नाव जेव्हा या प्रकरणात समोर आलं तेव्हा तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील चॅटींगचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सारा अली खान – बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचंही नाव ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आले होते. तिला सुशांत सिंग प्रकरणात नोटीसही पाठविण्यात आले होते. रियासोबत तिनं पार्टीमध्ये भाग घेतला होता.

रकुल प्रीत सिंह – एनसीबीनं रकुलला नोटीस पाठवले होते. रियानं रकुलचं नाव घेतलं होतं. तिनं सांगितलं होतं की, माझ्या घरी पोलिसांना जे ड्रग्ज सापडले ते माझे नसून रकुलचे होते.
रिया चक्रवर्ती – सुशांतच्या जाण्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. तिला एनसीबीनं अटकही केली होती. तिच्यासह बॉलीवूडमधील 25 जणांना एनसीबीनं त्यावेळी ताब्यात घेतलं होतं. आपण ड्रग्ज घेत असल्याचं रियानं चौकशी दरम्यान सांगितलं होतं.
अर्जुन रामपाल – अभिनेता अर्जुन रामपालचे नाव जेव्हा या प्रकरणात समोर आले तेव्हा त्याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या गर्लफ्रेंडच्या भावाला गोव्यातून पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.
भारती सिंह- हर्ष लिंबाचिया – कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्यावर एनसीबीनं कारवाई केली होती. त्यांना अटकही झाली होती. भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. आपण गांजाचे सेवन करत असल्याचे त्या दोघांनी सांगितले होते.
अरमान कोहली – अरमान कोहलीवरही कारवाई करण्यात आली आहे. जानी दुश्मन या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर आला होता. याशिवाय त्यानं बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. त्याच्या घरावर एनसीबीनं छापा मारला होता. त्याच्या घरातून कोकेन जप्त करण्यात आले होते.
गौरव दीक्षित  – टेलिव्हिजन सुपरस्टार गौरव दीक्षितला देखील एनसीबीनं अटक केली होती. त्याच्या घरावर छापा टाकून एनसीबीनं एम डी आणि ड्रग्ज जप्त केले होते. त्याची चौकशी ही एजाज खानच्या आधारे करण्यात आली होती.

एजाज खान – ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर अभिनेता एजाज खानलाही अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असून त्यानं काही सेलिब्रेटींची नावं सांगितली होती. त्याला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here