बॉलीवूडचा किंग खान (bollywod king khan sharukh khan) शाहरुखच्या मुलाला आर्यनला (aryan khan) एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे चौकशीही केली आहे. त्या दरम्यानं त्यानं आपल्याला या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्याचे व्हाट्स अप चॅट चेक करण्यात आले तेव्हा त्यातून काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तो ड्रग्ज घेत असल्याचा खुलासा त्यात केला होता. यासगळ्या प्रकरणाविषयी जेव्हा शाहरुखला समजलं तेव्हा त्यानं तडक भारतात यायचा निर्णय घेतला आहे. तो सध्या स्पेनमध्ये त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होता. त्यानं आता ते शुटींग रद्द केल्याची माहिती हाती आली आहे.

दीपिका पादुकोण आणि त्याची प्रमुख भूमिका असलेला पठाण नावाच्या चित्रपटाची शुटींग स्पेनमध्ये सुरु आहे. शाहरुख त्याचे चित्रिकरण पुढे ढकलेले आहे. अशी माहिती इंडिया टूडेनं दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख सातत्यानं एनसीबीच्या संपर्कात असल्याचे कळते आहे. काही करुन आपल्याला ग्राउंड रियॅलिटी समजायला हवी. यासाठी त्यानं आता मोर्चेबांधणी केल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या एनसीबी ही आर्यन खानची चौकशी करते आहे. त्याला कॉर्डेलिया या क्रुझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीच्या दरम्यान चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यासगळ्या प्रकरणावर शाहरुख कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी केल्याचे समजते आहे.

असं सांगण्यात आले की, तो त्याच्या पठाण चित्रपटातील एका गाण्यासाठी स्पेनमध्ये गेला आहे. तिथं तो दीपिकासोबत एक गाणं शुट करणार होता. ते झाल्यावर परतणार होता. अजून पर्यत त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आर्यन खान हा काही केवळ एकटाच बॉलीवूड सेलिब्रेटी नव्हता जो त्या क्रुझवर होता. त्याच्याबरोबर आणखीनही काही सेलिब्रेटींच्या मुलांची नावं समोर आली आहे. आर्यनच्या बाबत सांगायचे झाल्यास तो सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो. त्यानं लो प्रोफाईल राहणं पसंत केलं आहे. मात्र अशा प्रकारच्या पार्टीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

एनसीबीनं आर्यन खानची चौकशी सुरु केली आहे. त्याचे त्या पार्टीशी काय कनेक्शन आहे हे पाहण्यासाठी त्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. आर्यननं दिलेल्या माहितीनुसार आपलं त्या पार्टीशी कोणतेही देणंघेणं नाही. मला त्या पार्टीचे निमंत्रणही नव्हते. अद्याप आर्यनला अटक करण्यात आली नसली तरी त्याच्याकडे या प्रकरणात संशयित म्हणून पाहिले जात आहे. याविषयीची अधिक माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. आर्यन हा शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा आहे. त्यांना सुहाना नावाची मुलगीही आहे. ती देखील सोशल मीडियावर मोठी सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना अब्राहम नावाचा आणखी एक मुलगा आहे. आर्यनविषयी सांगायचं झाल्यास, त्यानं 2019 मध्ये द लायन किंग मधून पदार्पण केलं. त्यानं त्यात सिम्बा पात्रासाठी आवाज दिला होता. शाहरुखनं त्याला त्या लायन किंगसाठी लाँच केल्याचीही चर्चा होती.

हेही वाचा: बॉलीवूडला हादरा देणारा NCB अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

हेही वाचा: फक्त शाहरुखचा मुलगा अशी आर्यनची ओळख नाही तर…

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here