नागपूर : केळीला आरोग्यशास्त्रात फार महत्त्व आहे. अनेक व्याधींवर केळ गुणकारी तर आहेच; शिवाय खिशाला परवडणारेही आहे. दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन व ब्लोटिंगपासून केळ वाचवते. केळ हे मुळात ‘प्रबायोटिक’ असल्यामुळे आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. दिवाळीच्या दिवसांत फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास, उदा. अपचन, ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते. तेव्हा उपवासाला फराळ कराच; पण केळ्याला विसरू नका. चला तर जाणून घेऊया याच्या लाभाविषयी…

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळी वरदान ठरते. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो. जी साखर सफरचंदात आहे, तीच केळ्यांमध्येही आहे.
महत्त्वाच्या आणि अतिशय थकवणाऱ्या कामाच्या दिवसांमध्ये केळ खाल्याने डिहायड्रेशन व पायात गोळे येण्यापासून वाचवते.
केळ्यात असलेला खनिजांचा साठा हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळी खाल्लीच पाहिजेत.
दिवसाची सुरुवात केळी खाऊन केल्याने दिवसभरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here