नवरात्रीत त्या त्या रंगाचे कलर फॉलो करण्याचा मोठा ट्रेंड आहे. अनेकजण त्या त्या रंगाचे कपडे घालतात. पण यावेळी असे कपडे घालण्याबरोबरच रोजच्या जेवणात या रंगाचा वापर करता आला तर! या नवरंगामुळे शरीराला पोषकद्रव्ये मिळवून शरीर सुदृढ राखण्यास मदतही होईल.

आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या, फळे मुंबलक प्रमाणात मिळतात. त्याच रंगांचा वापर करून रोजची भाजी, वेगवेगळे पुलाव, सॅलेड्स, सूप असा मेन्यू जेवणासाठी ठरवता येईल. काही रंग मिक्स करून रंगाचा मेळही साधला जाईल. मग या नवरात्रीत नवरंगी डाएट फेस्टिवल करण्याचा प्रयत्न करून पाहा. त्यासाठी हा मेन्यू.

दिवस पहिला- रंग पिवळा
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाश्त्यामध्ये तुम्ही तुम्ही पोहे, हळद घालून तिखट-मिठाचा शिरा, शेवयांचा उपमा, ढोकळा असे काही पदार्थ करू शकता. तर, जेवणात उकडलेल्या बटाट्याची भाजी, ताकाची कढी, पोळी, भात असे पदार्थ तर रात्रीच्या जेवणात पिठलं भात, मुगाची खिचडी, लेमन राईस यापैकी काहीही पदार्थ तुम्हाला बनवता येतील.
दिवस दुसरा- रंग हिरवा
दुसऱया दिवशी तुम्ही नाश्त्याला मेथीचे पराठे, हिरव्या मुगाचा ढोकळा असे पदार्थ करू शकता. तर दुपारच्या जेवणात भेंडीची तळून भाजी, दाल पालक, पोळी करता येईल. रात्री जेवणात तुम्हाला पालक पनीर, हराभरा कबाब, कोरिएंडर राईस यापैकी काहीही करता येईल.
दिवस तिसरा- रंग करडा
नाचणी, बाजरी पीठ एकत्र करून आंबील तिसरया दिवशी नाश्त्याला करता येईल. तर दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी, चवळीची किंवा मसुराची उसळ, भात असे प्रकार ठेवता येतील. रात्रीच्या जेवणात बाजरीचा खिचडा किंवा भाकरी खाऊ शकता.
दिवस चौथा- रंग केशरी
यावेळी नाश्त्याला संत्र्याचा ज्यूस, गाजराचे काप करून खाता येऊ शकतात. तर दुपारच्या जेवणात भोपळ्याची भाजी,गाजराची कोशिंबीर, आमटी, पोळी, भात हा मेन्यू ठेवता येईल.
रात्री जेवणात गाजर- भोपळ्याचे सूप, भात, गाजर हलवा असा मेन्यूही तुम्हाला ट्राय करता येईल.
दिवस पाचवा- रंग पांढरा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी नाश्त्यामध्ये इडली, चटणी,पांढरा ढोकळा खाता येऊ शकतो. तर दुपारच्या जेवणात तांदळाची भाकरी, तांदळाची किंवा शेवयाची खीर, नुसत्या मुळ्याची भाजी आणि रात्री दूधी भोपळा- काकडीचे सूप, तुप, मीठ भात किंवा मऊ भात असे खाता येऊ शकते.
दिवस सहावा- रंग लाल
डाळिंब, कलिंगडाचे काप असा हलका प्रकार नाश्त्याला सहाव्या दिवशी चालू शकेल, तर जेवणात टॉमेटोची भाजी, लाल तिखट घालून केळ्याची भाजी, पोळी, भात आणि
रात्रीचे जेवण टोमॅटो सूप- जिरा राईस असे करता येईल.
दिवस सातवा- रंग निळा
हा रंग खूप विचार करायला लावणारा आहे. नाश्ता म्हणून तुम्ही नुसत्या ब्ल्यू बेरीज खाऊ शकता. किंवा गोकर्णाच्या फुलांचा वापर करून केलेले ज्यूस सध्या चलतीत आहे जेवणात निळ्या वांग्याची भाजी, भरीत, पोळी, भात असा मेन्यू तर वांगी घालून केलेला भात रात्री खाऊ शकता.
दिवस आठवा- – रंग गुलाबी किंवा जांभळा
बिटाचा पराठा हा पौष्टीक पर्याय तुम्हाला आठव्या दिवशी नाश्त्याला करता येईल. तर भरली वांगी, नाचणीची भाकरी, आमटी, भात असा मेन्यू दुपारच्या जेवणासाठी विचार करा.
रात्रीचे जेवण टॉमेटो, बीट, गाजर, आवडीच्या भाज्या घालून सुप असे करता येईल.
दिवस नववा- रंग मोरपिशीनवव्या दिवशी नाश्त्यासाठी मेथी- पालकाचा परोठा करता येईल. जेवणात अळू- पालकाची मिक्स भाजी, सॅलेड, घेवड्याची भाजी, पोळी, भात तर रात्रीचे जेवणासाठी अळूची भाजी, पालकाची पुरी, भात असे करता येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here