आयपीएलच्या 14 व्या हंगामात अंपायरिंगवर अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचाकडे सोपवले निर्णय वादग्रस्त असल्याचे दिसून आले. पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात राहुल त्रिपाठीनं पडकडलेल्या लो कॅचवरुन वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या पंचांनी लोकेश राहुलच्या बाजूने निकाल दिल्यानंतर या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता आणखी एक भर पडलीये. यावेळी पंजाबच्या विरोधात निर्णय गेल्याचे पाहायला मिळाले.

पंजाब आणि बंगळुरु यांच्यात शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर सलामीवीर देवदत्त पडिक्कलने रिव्हर्स स्विप फटका मारण्याचा प्रयत्न केला. बिश्नोईच्या गुगलीने त्याला चकवा दिला अन् चेंडू बॅटची कड घेऊन लोकेश राहुलच्या हातात विसावला. तिसरे पंच के श्रीनिवासन यांनी देवदत्तच्या बाजूनं निर्णय दिला. त्यामुळे या विकेटसाठी घेतलेला पंजाबचा रिव्ह्यू अयशस्वी ठरला.

हेही वाचा: IPL 2021: जड्डूचा सिक्सर अन् ऋतूराजची तलवारबाजी; व्हिडिओ व्हायरल

मैदानातील पंचांनी देवदत्तच्या विरोधातील अपील फेटाळल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघाने रिव्ह्यू घेतला. अल्ट्रा टेक्नोलॉजीमध्ये चेंडू ग्लोव्जला स्पर्श झाल्याचे दिसत होते. तिसऱ्या पंचांनी बॅट नॉट इनवॉल्व म्हणत देवदत्तला नाबाद ठरवले.

हेही वाचा: IPL 2021: मुंबई स्पर्धेबाहेर?; प्लेऑफसाठी रोहितच्या फलटणला…

त्यांनी ग्लोव्जला लागलेल्या चेंडूचा विचार न करता मैदानातील पंचाला आपल्या निर्णयावर कायम राहण्यास सांगितले. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल मैदानातील अंपायरसोबत ग्लोव्जला लागल्याचे सांगत याचा विचार झाला नाही, असे म्हणताना दिसले. परंतु पंचांनी त्याचे ऐकले नाही. देवदत्तच्या विकेटपायी पंजाबला रिव्ह्यूही गमवावा लागला. सोशल मीडियावर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसते. DRS मध्ये सुधारणेची गरज आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही या निर्णयावर उमटल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here