अकोले (जि. अहमदनगर) : भंडारदरा जलाशय काठोकाठ तुडुंब भरले असून शनिवार- रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांनी परिसरात मोठी गर्दी केली. तरुणाई मोठ्या प्रमाणात असल्याने स्पिलवे जवळील भिंतीवर उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. या ठिकाणी जाण्यास मज्जाव असल्याने या भिंतीवरून पाय घसरून आतापर्यंत दहा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र तरूण- तरूणी कुणाचही ऐकत नाहीत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्य़ता आहे.

या परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी

तरुण तरुणी या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढत आहेत. अगदी कमी जागेत उभे राहून हा प्रकार सुरू आहे. जर पाय सरकला व झोक गेला तर मृत्यूला जवळ करणारी घटना दुर्दवाने घडू शकते. मात्र पोलिस व जलसंपदा विभागाचे नियंत्रण नसल्याने त्यांच्यावर बंधन नाही. काही मद्दपि तरुण हातात दारूची बाटली घेऊन व भिंतीवर बसून नको ते प्रकार करतात. भंडारदरा जलाशयाचे संरक्षण करणारी यंत्रणा कोलमडली आहे. यापूर्वी पोलिसांवर हात उचलण्याचा प्रकार देखील झाला आहे. जलाशयात फिरणाऱ्या होड्या देखील जोखीम पत्करून जलशयात पर्यटकांना घेऊन फिरताना दिसतात मात्र त्यांना लहान लावण्यासाठी यंत्रणा कमी पडत असून याबाबत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तरुण तरुणी या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढत आहेत. अगदी कमी जागेत उभे राहून हा प्रकार सुरू आहे. जर पाय सरकला व झोक गेला तर मृत्यूला जवळ करणारी घटना दुर्दवाने घडू शकते. मात्र पोलिस व जलसंपदा विभागाचे नियंत्रण नसल्याने त्यांच्यावर बंधन नाही.

तरुण तरुणी या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढत आहेत. अगदी कमी जागेत उभे राहून हा प्रकार सुरू आहे. जर पाय सरकला व झोक गेला तर मृत्यूला जवळ करणारी घटना दुर्दवाने घडू शकते. मात्र पोलिस व जलसंपदा विभागाचे नियंत्रण नसल्याने त्यांच्यावर बंधन नाही.

”भंडारदरा जलाशयावर गेटवर आमचे कर्मचारी काम करतात मात्र स्पीलवेच्या भिंतीवर आम्ही नियंत्रण करू शकत नाही याबाबत पोलिस विभागाला पत्र दिले आहे.” – डी.डी.नांनोर, कार्यकारी अभियंता जलसंपदा.

”भंडारदरा गेटवर आमचे चार पोलिस आहेत, स्पीलवे जवळ पोलिस शनिवार- रविवारी असतात मात्र बंदोबस्त कारणामुळे पोलिस बळ कमी पडते त्याचे नियोजन केले जात आहे.” – नरेंद्र साबळे, सहायक पोलिस निरीक्षक.

हेही वाचा: कुणी तलाठी देता का, तलाठी? राजापूरकरांची आर्त हाक

”भंडारदरा येथे पोलिस असतात मात्र त्यांना अकोले येथे पाठविले जाते. कायमस्वरूपी नियोजन व्हावे अशी मागणी केली आहे.” – दिलीप भांगरे, सरपंच शेंडी

”मद्यपी पर्यटक रस्त्यावर बसून दारू पितात व तिथेच बाटल्या प्लास्टिक टाकून निघून जातात, त्यासाठी पोलिस बळ वाढविणे आवश्यक आहे.” – पांडुरंग खाडे, सरपंच भंडारदरा

हेही वाचा: अहमदनगर : संगमनेर खुर्द परिसरात ९ लाखांचा गांजा जप्त

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here